Monday, September 25, 2023

‘आलियाने रस्त्यावर पडलेली चप्पल उचलली अन्…’ अभिनेत्रीच्या ‘त्या’ कृतीचं सोशल मीडियावर होतंय कौतुक

अभिनेत्री आलिया भट्टची गणना अतिशय सुंदर आणि हुशार अभिनेत्रींमध्ये केली जाते. आलियाही खूप विचारपूर्वक कपडे घालून चाहत्यांसमोर येत असते. आलिया सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येते. आलियाने अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्ध मिळवली आहे. तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. नुकताच आलियाचा हाताने चप्पल उचलून देतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

आलियाचा (alia bhatt ) नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिची आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्टसोबत पोज देताना दिसत आहे. त्यानंतर तिने असे काही केले की नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. आलिया व्हिडीओमध्ये पापाराझींना हाताने चप्पल उचलून देताना दिसत आहे. लोक अभिनेत्रीचा हा व्हिडिओ पाहून तिचे कौतुक करत आहेत.

रात्रीच्या वेळी जेव्हा अभिनेत्री आलिया आई सोनी राजदान आणि शाहीन भट्टसोबत फिरायला गेली तेव्हा पापाराझींनी आलियाची झलक आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. त्याच वेळी, फोटो क्लिक करत असताना, एका पापाराझीची चप्पल पायातून खाली पडते. ती चप्पल हाताने उचलून अभिनेत्री आलिया सर्वांना विचारते ही कोणाची चप्पल आहे. नंतर ती स्वतः तिच्या हातातली चप्पल उचलते आणि पापाराझींना देते. तिच्या या व्हिडिओवर चाहते खूप साऱ्या कमेंट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 आलियाच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की,“ती खूपच गोड आणि विनम्र आहे”, तर दुसऱ्याने लिहिलं की, “चित्रपटाचं प्रमोशन करण्याचा हा नवीन मार्ग आहे.” तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या दरम्यान आलिया ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. हा चित्रपच 28 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Famous actress alia bhatt sweet gesture wins hearts video goes viral)

अधिक वाचा- 
“मला स्त्रियांचे शरीर आवडते” राम गोपाल वर्मा यांनी ‘या’ अभिनेत्रीला लग्नाला नकार देताना केला होता खुलासा
“विचार मांडण्याचे स्वातंत्र्य असले तरी…” अदा शर्माचे द केरला स्टोरी सिनेमावर टीका करणाऱ्या कलाकारांना सणसणीत उत्तर

हे देखील वाचा