Friday, July 12, 2024

प्रसिद्ध अमेरिकन गायक मीट लॉफ यांचे निधन, पत्नीने सोशल मीडियावरून दिली माहिती

अमेरिकन म्युझिक इंडस्ट्रीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध गायक मीट लॉफ यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. ‘बॅट आउट ऑफ हेल’मुळे ते सर्वाधिक लोकप्रिय झाले. त्यांच्या मृत्यूला त्यांच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिला आहे. ज्येष्ठ अमेरिकन गायक मीट लाफ आता या जगात नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून फेसबुकच्या माध्यमातून सांगण्यात आले. त्याची पत्नी डेबोरा हिने ही माहिती दिली आहे.

मीट लॉफ (Meat Loaf) यांचा अल्बम आजही जगाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या प्रेमाने ऐकला जातो. या गायकाचे केवळ अमेरिकेतच नाही, तर जगभरातील चाहते आहेत. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांचे चाहते निराश झाले आहेत.

कुटुंबीयांनी फेसबुकवरून मृत्यूची दिली माहिती

मीट लॉफ जगात राहिले नसल्याची माहिती गायकाच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. त्यावेळी पोस्टमध्ये लिहिले की, “मीट लॉफ यांचे आज रात्री निधन झाले आहे. हे कळवण्यास आम्हाला अतिशय दुःख होत आहे.” मीट हे आंतरराष्ट्रीय गायक होते. ते जगाच्या विविध भागात शो करत असे पण गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मीट यांचा जन्म २७ सप्टेंबर १९४७ रोजी झाला. ते त्यांच्या दमदार आवाजासाठी ओळखला जात असे. २० जानेवारी २०२२ रोजी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबात दोन मुली आहेत, शेवटच्या क्षणी ते त्यांच्यासोबत होते.

ग्रॅमी पुरस्कार जिंकला

अनेक अवॉर्ड शोमध्ये त्यांनी आपले कौशल्य दाखवले आहे. सर्वोत्कृष्ट सोलो रॉक व्होकल परफॉर्मन्ससाठी ग्रॅमी पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनी बनवलेल्या म्युझिक अल्बमला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यांचे अल्बम ६५ दशलक्ष पर्यंत विकले गेले. असे अनेक विक्रम त्यांच्या नावावर होते. त्यांच्या जाण्याने अमेरिकन संगीत उद्योगाचे खरोखरच मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी केवळ गायनच केले नाही, तर अनेक चित्रपटांमध्ये अभिनयही केला. त्यांच्या आवाजात एक मजबूत ऊर्जा होती. ते त्यांच्या काळातील रॉकस्टार होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा