Wednesday, June 26, 2024

‘प्रयोगानंतर एक काकू काठी टेकवत…’, संकर्षण कऱ्हाडेने प्रेक्षकांना केली विनंती, म्हणाला, ‘महाराष्ट्रात…’

मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार संकर्षण कऱ्हाडे सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या निमित्ताने अमेरिका दौऱ्यावर आहे. दल्लास येथील नाटकाचा प्रयोग संपल्यावर अभिनेत्याला एक खास व्यक्ती भेटायला आली होती. हा अनुभव संकर्षणने सोशल मीडियावर शेअर केला आहे. संकर्षण सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियवावर शेअर करत असतो.

संकर्षणने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, ““माझ्या आयुष्यातला हा फार फार गोड क्षण…प्लिज वाचा. आज अमेरिकेतला डॅल्लसचा प्रयोग जोरदार झाला.. प्रयोगानंतर एक काकु काठी टेकवत भेटायला आल्या… त्यांचं नाव “उत्तरा दिवेकर” ह्या त्याच आहेत ज्यांच्या घरी अलिबागला मी 2011 साली माझा “आम्ही सारे खवय्ये” चा पहिला भाग शूट केला होता.. योगायोगाने त्या सिजनचं नाव होतं “आई मला भूक लागलीये”.. आज मला त्या म्हणाल्या “मी माझ्या मुलाचं नाटक पहायला आले..” ईतकं भरून आलं मला …. कलाकाराला काय हवंय..?

आज 12 वर्षं झाली मी हा कार्यक्रम करतोय…. ”खवय्ये” मुळे मला अनेक कुटुंब भेटली , अनेक नाती तयार झाली आणि अशा अनेक “आई” भेटल्यात ज्या जगभरांत कुठेही राहात असल्या तरी माझी वाट पाहातायेत आणि आज “नियम व अटी लागू नाटकाच्या निमित्ताने भेट झाली …. खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि हो आजपासून आमचा सिनेमा रिलिज होतोय. महाराष्ट्रात “तीन अडकून सीताराम” चित्रपटगृहात जाउन नक्की बघा. ” अशी पोस्ट करत संकर्षण प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे.

संकर्षणच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी संकर्षणच्या प्रेमळ स्वभावावर कौतुक व्यक्त केले आहे. ‘नियम व अटी लागू’ या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. (Famous artist in Marathi entertainment industry sankarshan karhade shared his drama show experience in dallas america sva)

आधिक वाचा-
हॉटनेसचा कहर! सनी लिओनीच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियावर राडा; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘एकदम कडक’
तमन्नाने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील सांगितले ‘ते’ धक्कादायक सत्य; म्हणाली, ‘मी विनंती करते…’

हे देखील वाचा