Thursday, June 13, 2024

तमन्नाने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील सांगितले ‘ते’ धक्कादायक सत्य; म्हणाली, ‘मी विनंती करते…’

अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. तिने तिच्या अभिनयाच्या आणि सौंदर्यच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तमन्ना तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो पाहताचा चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. तिच्या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असतात. तमन्नाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी सिनेमांव्यतिरिक्त, तमन्नाने तेलुगू, तमिळ आणि अगदी ओटीटीमध्येही काम केले आहे.

अभिनेत्रीने दिग्गज अभिनेत्यांसोबत आणि मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तमन्नाने (Tamannaah Bhatia) ‘श्री’ या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, त्यामुळे दक्षिण चित्रपट उद्योग तिच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या इंडस्ट्रीत काम करत असताना तिला अनेक घटनांचा सामना करावा लागला. तमन्नाने अलीकडेच साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील तिच्या अनुभवाबद्दल सांगितला आहे.

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तमन्ना म्हणाली, दक्षिणेत काही सूत्रे वापरली जातात कारण ती सोपी असतात. याशिवाय तमन्नाने बॉलीवूडमधील तिच्या अपयशाबद्दलही बोलले. तमन्ना म्हणाली की, ‘काही व्यावसायिक चित्रपटांमध्ये मी माझ्या पात्रांशी संपर्क साधू शकले नाही आणि चित्रपट निर्मात्याला ती तीव्रता कमी करण्याची विनंती करायचे. मात्र नंतर मी ते भाग करणे बंद केले. मी अशा चित्रपटांचा भाग न होण्याचा प्रयत्न करते. जिथे पुरुषंचे वर्चस्व असते ते मला असह्य होते.

अभिनेत्री तमन्ना पुढे म्हणाली, ‘बॉलीवूडमध्ये मी केलेले चित्रपट चालले नाहीत. कारण ते त्यांचे नशीब होते. मी कधीही वैयक्तिक अपयश म्हणून पाहिले नाही. कारण एखादा चित्रपट अनेक लोकांच्या योगदानाने बनतो. मी आपले यश आणि अपयश गांभीर्याने घेत नाही. अभिनय ही माझी आवड आहे आणि कॅमेऱ्याचा सामना करण्यासाठी मी तयार असते. नुकतीच ‘आखरी सच’ या वेब सीरिजमध्ये ती दिसली. याआधी ती रजनीकांतचा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट ‘जेलर’मध्येही दिसली होती. यासोबतच ती सध्या विजय वर्मासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे.

आधिक वाचा-
दहावीत असताना अडल्ट वेबसाईटवर जान्हवी कपूरचा मॉर्फ फोटो झालेला व्हायरल, अभिनेत्रीने व्यक्त केला अनुभव
‘…मग हे वेडेचाळे कशासाठी?’, जेष्ठ्य कलाकारांच्या रिल्सवर निळू फुले यांच्या लेकीने मांडले मत

हे देखील वाचा