Monday, May 27, 2024

“मोठं व्हायचं व्हा ना, इतकी घाई काय…” संकर्षण कऱ्हाडेची खास कविता व्हायरल; पाहा व्हिडीओ

मराठी मनोरंजनविश्वातील अष्टपैलू आणि हरहुन्नरी अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे होय. उत्तम कवी, लेखक, अभिनेता अशा विविध भूमिकांमधून त्याने त्याची ओळख निर्माण केली आहे. टेलिव्हिजन, सिनेमा आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये तो सतत झळकत असतो. गेल्या काही दिवरसांपासून संकर्षण त्याच्या नाटकांमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. त्याची नाटकातील भूमिका प्रेक्षकांंना खूप आवडते. प्रेक्षक संकर्षणच्या नाटकांना भरभरून प्रतिसाद देतात.

संकर्षण (Sankarshan Karhadet )सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. तसेच संकर्षण त्या आयुष्यातील काही प्रसंग देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. यादरम्यान संकर्षणचा एक व्हिडिओ सोशल मीडिायवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये संकर्षण कवीता म्हणताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये संकर्षण मोठं व्हायचं व्हा ना, इतकी घाई काय अशी कवीता सादर करत आहे. हा व्हिडिओ झी मराठीने त्याच्या इन्स्टाग्राम अकांउटवरू शेअर केला आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्राची किचन क्वीन या कार्यक्रमातील आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनाी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. संकर्षणचे सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

त्याच्या या व्हिडिओवर काही सेलिब्रेटींनी देखील कमेंट केली आहे. या व्हिडिओवर कमेंच करताना अभिनेत्री तेजस्विनी पंडितने लिहिले की, “मित्रा लव्ह यू, किती सुरेख रे” तर अभिनेता शशांक केतकरने लिहिले की, “अरे बाबा किती खरं लिहिशील. आत्ता समोर असतात तर कडकडून मिठी मारली असती.”

संकर्षण कऱ्हाडेविषयी सांगायच झाल तर, संकर्षणने ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘खुलता कळी खुलेना’ या मराठी लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच त्याने चित्रपटांमध्ये देखील काम केल आहे. (Video of actor Sankarshan Karhadet’s special poem goes viral)

अधिक वाचा- 
करिअरच्या सुरुवातीला विद्याला मुंबईतील 5 स्टार हॉटेलसमोर मागावी लागली हाेती भीक, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा
‘स्वर्ग असाच असतो’, सिद्धार्थ चांदेकरची ‘ती’ पोस्ट आली सोशल मीडियावर चर्चेत, एकदा वाचाच

हे देखील वाचा