Sunday, October 1, 2023

मोठी बातमी! बॉलिवूड गाजवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला 6 महिन्यांचा तुरुंगवास, ठोठावला ‘एवढ्या’ रुपयांचा दंड

एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीबाबत धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिग्गज अभिनेत्री आणि राजकारणी जया प्रदा यांना शुक्रवारी (दि. 11 ऑगस्ट) चेन्नईच्या एका न्यायालयाने दोषी ठरवले. जया प्रदा यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, कथितरीत्या त्यांच्यावर 5 हजार रुपयांचा दंडही ठोठावला गेला. 61 वर्षीय अभिनेत्रीवर आपल्या थिएटरमध्ये काम करणाऱ्यांना ईएसआयचे पैसे न दिल्याचा आरोप लावण्यात आला होता. कथितरीत्या, त्यांचे व्यावसायिक पार्टनर राम कुमार आणि राजा बाबू हे दोषी आढळले.

अभिनेत्री जया प्रदा (Jaya Prada) यांचे चेन्नईमध्ये एक थिएटर होते, जे बंद झाले. त्यानंतर थिएटरच्या कर्मचाऱ्यांनी जयांविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी म्हटले की, कर्मचाऱ्यांचा पगार कापला गेला आणि ईएसआयचे पैसेही न देण्याची तक्रार केली. त्यांच्यावर आरोप आहे की, सरकारी विमा महामंडळाला ईएसआयचे पैसे दिले गेले नाहीत.

जया प्रदा यांना तुरुंगवासाची शिक्षा
कथितरीत्या कामगार सरकारी विमा महामंडळाने जया प्रदा आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध चेन्नईच्या एग्मोर मॅजिस्ट्रेट कोर्टात प्रकरण दाखल करण्यात आले. यावेळी असाही सल्ला देण्यात आला की, अनुभवी अभिनेत्रीने आरोप मान्य केला आहे आणि खटला फेटाळण्याची मागणी करत, त्यांनी लांबलचक थकबाकी भरण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, न्यायालयाने त्यांची अपील फेटाळली आणि दंडासोबतच तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली.

जया प्रदा यांचे सिनेमे
जया प्रदा यांनी 70च्या दशकाच्या अखेरीस, 80चे दशक आणि 90च्या दशकाच्या सुरुवातीला हिंदी आणि तेलुगू सिनेसृष्टी गाजवली. त्यांची गणना प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये राहिली. त्यांनी कमी वयात साऊथच्या सिनेमांमध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर 1979मध्ये ‘सरगम’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तसेच, प्रसिद्धीही मिळवली. त्यांनी ‘कामचोर’ (1982), ‘तोहफा’ (1984), ‘शराबी’ (1984), ‘संजोग’ (1985), ‘आखिरी रास्ता’ (1986), ‘एलान-ए-जंग’ (1989), ‘आज का अर्जुन’ (1990), ‘थानेदार’ (1990) आणि ‘मां’ (1991) यांसारख्या अनेक सिनेमात आपल्या अभिनयाचा डंका वाजवला.

महत्त्वाच्या बातम्या-
‘गदर 2’च्या वादळात उडून गेला अक्षयचा ‘OMG 2’, चांगले रिव्ह्यू मिळूनही केली फक्त ‘एवढी’ कमाई
‘Gadar 2’च्या पहिल्या दिवसाची कमाई पाहून सलमानही हादरला; म्हणाला, ‘ढाई किलो का हाथ…’

हे देखील वाचा