Saturday, September 30, 2023

‘गदर 2’च्या वादळात उडून गेला अक्षयचा ‘OMG 2’, चांगले रिव्ह्यू मिळूनही केली फक्त ‘एवढी’ कमाई

‘ओएमजी- ओह माय गॉड’ हा सिनेमा 2012 साली प्रदर्शित झाला होता. आता तब्बल 11 वर्षांनंतर या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शुक्रवारी (दि. 11 ऑगस्ट) अक्षय कुमार याचा ‘ओएमजी 2‘ सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांपासून ते समीक्षकांपर्यंत सर्वांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सिनेमाचा कंटेंट आणि कलाकारांच्या दर्जेदार अभिनयाची चोहोबाजूंनी प्रशंसा करण्यात आले. अशात निर्मात्यांना आशा आहे की, चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल.

‘ओएमजी 2’ ओपनिंग डे कलेक्शन
ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बहुप्रतिक्षित ‘ओएमजी 2’ (OMG 2) सिनेमा चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला आला. माध्यमांतील वृत्तांनुसार, या सिनेमाने भारतात पहिल्या दिवशी फक्त 10.26 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र, अद्याप अधिकृत आकडे समोर येणे बाकी आहेत. खरं तर, या सिनेमाची टक्कर सनी देओल (Sunny Deol) याच्या ‘गदर 2‘ (Gadar 2) सिनेमासोबत आहे. या सिनेमाच्या कंटेंटची सर्वत्र वाहवा होत आहे. वृत्तांनुसार, ‘गदर 2’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 40 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

खरं तर, अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या ‘ओएमजी 2’ सिनेमाचे दिग्दर्शन अमित राय यांनी केले आहे. या सिनेमात अक्षयव्यतिरिक्त पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत. तसेच, यामी गौतम (Yami Gautam) हीदेखील महत्त्वाचे पात्र साकारत आहे. अक्षयच्या या सिनेमावर कात्री मारल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने अ प्रमाणपत्रही दिले आहे.

चित्रपटगृहांकडे परतले प्रेक्षक
बॉक्स ऑफिसवरील सिनेमांचा दुष्काळ आता संपताना दिसत आहे. कोरोनानंतर 2022मध्ये प्रेक्षकांनी बॉलिवूड सिनेमांकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, 2023 वर्ष बॉलिवूडसाठी चांगले ठरताना दिसत आहे. ‘ओएमजी 2’ यावर्षीचा आठवा सर्वात मोठा सिनेमा आहे. या सिनेमाची सुरुवातही शानदार झाली आहे.

मात्र, ‘गदर 2’ सिनेमासोबत टक्कर असल्यामुळे वीकेंडला कोणता सिनेमा जास्त पैसा कमावतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (superstar akshay kumar film omg 2 first day box office collection pankaj tripathi)

महत्त्वाच्या बातम्या-
‘Gadar 2’च्या पहिल्या दिवसाची कमाई पाहून सलमानही हादरला; म्हणाला, ‘ढाई किलो का हाथ…’
शॉकिंग! प्रसिद्ध भरतनाट्यम डान्सरचे निधन, कलाविश्वावर दु:खाचा डोंगर

हे देखील वाचा