Monday, October 2, 2023

‘Gadar 2’च्या पहिल्या दिवसाची कमाई पाहून सलमानही हादरला; म्हणाला, ‘ढाई किलो का हाथ…’

शुक्रवारी (दि. 11 ऑगस्ट) बॉलिवूडचा पॉवरफुल अभिनेता सनी देओल याचा ‘गदर 2‘ सिनेमा चित्रपटगृहात रिलीज झाला. या बहुप्रतिक्षित सिनेमाने रिलीज होताच पहिल्याच धमाल केली आहे. या सिनेमाची सर्वत्र चर्चा होत आहे. ‘गदर’चे चाहते या सिनेमाच्या सीक्वलबाबत खूपच उत्सुक होते. आता जेव्हा सिनेमाचा दुसरा भाग रिलीज झाला, तेव्हा यालाही प्रचंड प्रेम मिळाले. सिनेमाला मिळालेले प्रेम पाहून सुपरस्टार सलमान खान हादेखील स्वत:ला प्रशंसा करण्यापासून रोखू शकला नाही.

सलमान खानची पोस्ट
अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने सोशल मीडियावर ‘गदर 2’ (Gadar 2) सिनेमाबाबत एक पोस्ट केली आहे. या पोस्टसोबतच त्याने ‘गदर 2’ ओपनिंग डे कलेक्शन (Gadar 2 Opening Day Collection) याविषयीही सांगितले आहे. सलमानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सिनेमाचा पोस्टर शेअर करत लिहिले की, “ढाई किलोचा हात 40 कोटींच्या ओपनिंगच्या बरोबर. सनी पाजी जबरदस्त. गदर 2च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

गदर 2ची कमाई किती?
‘गदर 2’ सिनेमाविषयी बोलायचं झालं, तर रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने पहिल्या दिवशी 40 ते 45 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशीच बॉक्स ऑफिसवर गदरने धमाल केली आहे. खरं तर, सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केली आहे, याबाबत अद्याप अधिकृत आकडे समोर आले नाहीयेत.

सिनेमाविषयी बोलायचं झालं, तर सिनेमात सनी देओल (Sunny Deol) याच्याव्यतिरिक्त अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि मनीषा वाधवा या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या 2001 सालच्या ‘गदर: एक प्रेम कथा’ सिनेमाचा सीक्वल आहे. विशेष म्हणजे, ‘गदर’ हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता.

खरं तर, यावेळी बॉक्स ऑफिसवर सनी देओल आणि अक्षय कुमार यांची बॉक्स ऑफिसवर टक्कर आहे. एकीकडे, ‘गदर 2’ धमाल करत आहे, तर दुसरीकडे, अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या ‘ओएमजी 2’ सिनेमालाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ‘ओएमजी 2’ सिनेमालाही समीक्षक आणि चाहते, दोघांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. (actor sunny deol film gadar 2 opening first day box office collection 40 crore see superstar salman khan post)

महत्त्वाच्या बातम्या-
शॉकिंग! प्रसिद्ध भरतनाट्यम डान्सरचे निधन, कलाविश्वावर दु:खाचा डोंगर
अभिनयातच नव्हे, तर अभ्यासातही अव्वल आहे सारा; ‘या’ अवघड विषयात 100 टक्के मिळवत केलं होतं तिने टॉप

हे देखील वाचा