Tuesday, June 18, 2024

पत्नीला झोपेतून उठवून प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर झाला रोमँटिक, व्हिडिओ पाहून धर्मेश म्हणाला…

बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर आहेत, ज्यांनी आपल्या नृत्याने प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडले आहे. विशेष म्हणजे, हे डान्स कोरिओग्राफर आपल्या डान्सव्यतिरिक्त आता सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. याच यादीत समावेश होतो, तो म्हणजे डान्स कोरिओग्राफर पुनीत पाठकचा. पुनीतचा एक खास व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये तो आपल्या पत्नीसोबत दिसत होता.

कित्येकदा तो सोशल मीडियावर आपल्या पत्नीसोबत म्हणजेच निधी मोनी सिंगसोबत फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतो. अलीकडे त्याने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात पुनीत आणि निधी त्यांच्या बेडरूममध्ये दिसत आहेत.

पुनीतने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन दिले आहे की, “ही झोपली आहे की ऍक्टिंग करतेय.”

धर्मेशने केली कमेंट
हा व्हिडिओ स्वतः पुनीत पाठकने बनवला आहे. जेव्हा व्हिडिओ बनवत असतो, तेव्हा निधीने डोळे मिटलेले असतात. असे वाटते ती झोपली असते. मात्र, तो त्याच्या हाताने तिला ढकलतो त्यानंतर ती डोळे उघडते आणि पुनीतला त्याचा व्हिडिओ बनवताना पाहते. व्हिडिओच्या शेवटी हे जोडपे एकमेकांना मिठी मारतात. या व्हिडिओवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. पुनीतचा मित्र आणि डान्स कोरिओग्राफर धर्मेशनेही या पोस्टवर कमेंट केली आहे. त्याने लिहिले आहे की, “फ्रेम थोडी थरथरत आहे.” (famous choreographer punit pathak share latest video with wife dharmesh sir comment)

‘झलक दिखला जा’च्या सेटवर झाली होती दोघांची भेट
पुनीत पाठकने 2020 मध्ये निधी सिंगशी लग्न केले होते. पुनीत आणि निधीच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचं झालं, तर ते दोघे पहिल्यांदा ‘झलक दिखला जा’च्या सेटवर भेटले होते. शोच्या दरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली व त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मग 11 डिसेंबर, 2020 रोजी ते विवाहबंधनात अडकले.

नृत्य कारकिर्दीची सुरुवात
पुनीत पाठकचा नृत्य कारकिर्दीबाबत बोलायचे झाले, तर त्याला सुरुवातीला क्रिकेटपटू किंवा चित्रपट निर्माता व्हायचे होते. कॉलेजच्या दिवसांमध्ये त्याची आवड डान्समध्ये होती. पुनीतने आपल्या घरात याबद्दल सांगितले, तेव्हा पुनीतचे वडील डॉक्टर जयेश पाठक यांना त्याचा निर्णय मान्य नव्हता. आपल्या मुलाने कौटुंबिक व्यवसाय सांभाळावा, अशी वडिलांची इच्छा होती यावरून वडिलांशी त्याचे अनेक वाद विवाद होत होते. पुनीतचा धाकटा भाऊ निशित पाठक याने आपल्या मोठ्या भावाची इच्छा पूर्ण करण्यासाठी व्यवसाय सांभाळण्याचा निर्णय घेतला. पुनीतच्या धाकट्या भावालाही नृत्यात करिअर करायचे होते, पण मोठ्या भावासाठी त्याने आपल्या इच्छेचा त्याग केला.

पुनीतने आपल्या भावाचा त्याग व्यर्थ जाऊ दिला नाही. डान्सच्या दुनियेत काम करण्यासाठी त्याने दिवस-रात्र एक केले. 2009 ते 2010 मध्ये पुनीतने ‘डान्स इंडिया डान्स 2’ या रियॅलिटी शोमध्ये भाग घेतला, आणि तो या शोचा दुसरा उपविजेता ठरला. तेव्हापासून त्याने आपल्या कारकिर्दीत कधीही मागे वळून पाहिले नाही.

अनेक रियॅलिटी शोमध्ये त्याने पाहुणा, डान्स कोरिओग्राफर आणि परीक्षक म्हणून भागही घेतला. 2019 सालच्या ‘खतरों के खिलाडी 9’ मध्ये भाग घेतला आणि तो त्याचा विजेता ठरला. ‘डान्स प्लस’च्या पाचव्या पर्वात तो मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करत होता. यादरम्यान पुनीत पाठकनेही अभिनयात नशीब आजमावले 2013 मध्ये त्याने एबीसीडी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पुनीतने 2005 मध्ये ‘एबीसीडी 2’ मध्ये काम केले. त्यानंतर 2018 मध्ये आलेल्या ‘नवाबजादे’ या चित्रपटात तो कॉमेडी करताना दिसत होता. पुनीतने 2010 मध्ये पुन्हा एकदा नृत्यावर आधारित ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जय गंगाजल’च्या ‘त्या’ सीननंतर ढसाढसा रडू लागली होती प्रियांका चोप्रा, मग अभिनेत्याने…

-बोनी कपूर यांची इंस्टाग्रामवर एन्ट्री, मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी इंस्टावर आल्याचे अर्जुन कपूरने म्हणणे

-पोलिस म्हणून सलमान खानला आवडते ‘ही’ खास व्यक्ती; अभिनेत्याने सांगितले काही किस्से

हे देखील वाचा