Monday, June 24, 2024

पोलिस म्हणून सलमान खानला आवडते ‘ही’ खास व्यक्ती; अभिनेत्याने सांगितले काही किस्से

बॉलिवूड अभिनेता सलमान खान जवळपास ३० वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. आपल्या कारकिर्दीत अभिनेत्याने बरीच वेगवेगळी पात्रे साकारली आहेत आणि त्याच्या अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. त्याच्या अभिनयातून त्याने लोकांचे खूप मनोरंजन केले. सलमान खान कित्येक चित्रपटांमध्ये पोलिसाची भुमिका साकारताना दिसला आहे. आता तो अलिकडेच पुन्हा एकदा ‘अंतिम द फायनल ट्रूथ’ या चित्रपटात पोलिसाच्या भुमिकेमध्ये दिसला. तो या चित्रपटांत एक शीख पोलिस बनला आहे. सलमान खानला प्रेक्षकांची खूप मोठी साथ आहे. चित्रपट रिलीझ होऊन तीन दिवस झाले आहेत आणि त्या चित्रपटाने खूप चांगली कमाई केली आहे. (salman khan grandfather abdul rashid dig indore police favourite cop superstar)

सलमान खानचे आवडते पोलिस आहेत त्याचे आजोबा
सलमान खानला एका मुलाखतीत विचारले गेले की, त्याला सर्वात चांगला पोलीस कोण वाटतं? यावेळी अभिनेत्याने त्याच्या आजोबांचे नाव घेतले, जे पोलिस होते. सलमानने सांगितले की, “मी जितक्या कॉप चित्रपटांमध्ये काम केले आहे, ते सर्व खूप चांगले कॉप चित्रपट आहेत. ‘किक या चित्रपटामध्ये तर मी खूप नंतर पोलिस बनतो. त्यामुळे माझ्यासाठी कम्पेअर करणं खूप कठीण आहे की, कोणती पोलिसाची भुमिका माझी आवडती आहे. परंतु माझे आजोबा अब्दुल रशीद हे माझे आवडते पोलिस आहेत. त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा माझे वडील सलीम खान यांचे वय ९ वर्ष होते. माझे आजोबा मध्य प्रदेश इंदोर येथे डीआयजी होते.

आयुष शर्माच्या अभिनयावर केली चर्चा
सलमान खानने आयुष शर्माविषयी बोलताना सांगितले की, “त्याने खूप मेहनत घेतली आहे. बरेच वर्ष तो चित्रपटांमध्ये नव्हता. तो काम करू शकला नाही याचा राग आयुषच्या मनात होता. त्याने या चित्रपटात खूप मेहनत केली आहे. या चित्रपटासाठी त्याने आपले प्राण पणाला लावले. जेव्हा तो माझ्यासमोर अभिनय करायचा बऱ्याचदा रिटेक करवायचो आणि त्याच्यासोबत जास्त काम करायला मला आनंद व्हायचा. तसे तर आम्ही सोबतच राहतो. तुम्ही खूप मस्ती मज्जा करतो, हे सर्व तर नॉर्मल आहे. पण जेव्हा तो स्क्रीनवर माझ्यासमोर यायचा, तेव्हा तो खूप नर्वस व्हायचा. मग त्याला मी आराम आणि रिलॅक्स करायला सांगायचो.

तसेच सलमान खानने ‘औजार’, ‘राधे’, ‘दबंग’, ‘पत्थर के फूल’ और ‘गर्व’ सारख्या चित्रपटांमध्ये पोलिसाची भूमिका निभावली आहे. तर अलिकडेच ‘अंतिम’मध्ये पुन्हा एकदा खाकी वर्दीत दिसत आहे. या चित्रपटात सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्यासोबत महिमा मकवाना हीदेखील आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही आता प्रियांका चोप्राच्या पतीसोबत लावणार ठुमके, मिळाली ‘ही’ आंतरराष्ट्रीय संधी

-जीवे मारण्याची धमकी मिळताच कंगना रणौतने वादामध्ये ओढलं सोनिया गांधींचं नाव, म्हणाली, ‘जीव देईन, पण…’

-‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ फेम अभिनेत्याने उरकून टाकले लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आनंदाचा धक्का!

हे देखील वाचा