Thursday, September 28, 2023

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरांवर पार पडली शस्त्रक्रिया; ‘या’ आजाराने आहेत ते ग्रस्त

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक तसेच अभिनेते म्हणजे महेश मांजरेकर होय. मांजरेकरांचा जन्म 16ऑगस्ट 1958 रोजी झाला. त्यांनी  ‘अफलातून’ या मराठी नाटकांमधून अभिनयसृष्टीत पाऊल टाकले होते. त्यांच्या कामासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला आहे. दिग्दर्शनाशिवाय त्यांनी अनेक चित्रपटामध्ये अभिनय केला आहे.

नुकतीच महेश यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. ते बऱ्याच दिवसापासून मूत्राशयाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. यासाठी डाॅक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. महेश यांची ही शस्त्रक्रिया मुंबईतल्या एच. एन‌. रिलायंस फाउंडेशन रुग्णालयामध्ये झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही शस्त्रक्रिया अत्यंत सुरळीत पार पडली आहे.

महेश यांनी 1992 रोजी ‘जीवा सखा’ चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तसेच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातही काम केले. सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटात महेश यांनी सोनाक्षी सिन्हाच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांच्या पात्राचे खूपच कौतुक झाले होते.

महेश उत्तम एक चांगले गायकही आहेत. त्यांनी ‘कांटे’ या चित्रपटात गाणे गायले होते. महेश मांजरेकर केवळ अभिनेतेच नाही तर सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक देखील आहेत . त्यांनी ‘वास्तव’ चित्रपटात दिग्दर्शक म्हणून काम केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर त्यांनी ‘अस्तित्व’ आणि ‘कुरुक्षेत्र’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. महेश मांजरेकरांनी आपल्या अभिनयामुळे चाहत्यांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. महेश मांजरेकर यांनी ‘रेड्डी’, ‘बॉडीगार्ड’ सारख्या चित्रपटांमध्येही उत्तम भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी मराठी चित्रपटांमध्येही उत्तम कामगिरी केले आहे.

अधिक वाचा –

बोल्डनेसचा कहर! मृणाल ठाकूरच्या लूकने उडवली चाहत्यांची झोप

देशभक्तीच्या रंगात रंगला नकुल मेहता; चाहते म्हणाले, “सावधान होऊन आपल्या लोकशाहीला… “

हे देखील वाचा