प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. मांजरेकरांनी त्यांच्या अभिनय आणि दिग्दर्शनाच्या कौशल्याने देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून ते त्यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमामुळे भलतेच चर्चेत आहेत. अशात ते आणखी एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. महेश मांजरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अपघातादरम्यान एका आश्रमशाळेच्या संस्था चालकाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मांजरेकर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
मांजरेकरांवरील आरोप काय?
महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या गाडीला पुणे- सोलापूर महामार्गावर अपघात झाला होता. त्यादरम्यान त्यांची गाडी दुसऱ्या गाडीवर आदलळ्याचा आरोप केला जातोय. मांजरेकरांच्या गाडीचा अपघात ज्या गाडीशी झाला, ती गाडी आश्रमशाळा चालवणाऱ्या एका व्यक्तीची होती. त्यादरम्यान मांजरेकरांनी त्या व्यक्तीविरुद्ध वाईट वक्तव्य केल्याचा आरोप केला जातोय. त्यावेळी या प्रकरणात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. तसेच, पंढरपूरच्या माढा न्यायालयाने टेंभुर्णी पोलिसांना चौकशीचे आदेशही दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
टेंभुर्णी येथील संत रोहिदास आश्रम शाळेचे संस्थापक कैलास सातपुते आणि महेश मांजरेकर यांच्या गाडीचा अपघात झाला होता. हा अपघात पुणे- सोलापूर महामार्गावरील यवत गावाजवळ मागील वर्षी म्हणजेच 2021मध्ये झाला होता. त्यावेळी महेश मांजरेकर यांनी सातपुतेंची बदनामी करणारे भाष्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, सातपुतेंनी मांजरेकरांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हाही दाखल केला होता.
सातपुतेंनी माढा कोर्टात मांजरेकरांवर बदनामी करणारे वक्तव्य करून आपली प्रतिमा मलिन केल्याची फिर्याद दिली होती. सातपुतेंच्या तक्रारीची दखल घेत न्यायाधीशांनी टेंभुर्णी पोलिसांना मांजरेकरांविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत. अशात मांजरेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मांजरेकरांचे सिनेमे
स्वप्ननगरी मुंबईत 13 मे, 1953 रोजी जन्मलेल्या महेश मांजरेकर यांनी शंभरहून अधिक सिनेमात काम केले आहे. तसेच, अनेक सिनेमांची निर्मितीही केली आहे. त्यांनी ‘वास्तव’, ‘नटसम्राट’, ‘पांघरुण’ यांसारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे, तर ‘वाँटेड’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘उलाढाल’, ‘तीन पत्ती’, ‘लाल बाग परळ’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘हिंमतवाला’, ‘शूटआऊट ऍट वडाळा’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘मुंबई सागा’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘टोटल धमाल’ यांसारख्या सिनेमात अभिनय केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
लय भारी! ‘पावनखिंड’मधील ‘या’ अभिनेत्याने बांधली लगीनगाठ, जोडप्याचे फोटो जोरदार व्हायरल
‘देवों के देव महादेव’ फेम पार्वतीने गुपचुप उरकला साखरपुडा, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल…