Sunday, December 8, 2024
Home अन्य ‘चैतू’ची आई आता तरी त्याच्याशी बोलणार का? ‘नाळ 2’चा दुसरा टीझर एकदा पाहाच

‘चैतू’ची आई आता तरी त्याच्याशी बोलणार का? ‘नाळ 2’चा दुसरा टीझर एकदा पाहाच

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ‘नाळ‘ या चित्रपटाचा दुसरा भाग ‘नाळ 2‘ येत्या 10 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बालकलाकार श्रीनिवास पोकळे पुन्हा एकदा चैत्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘नाळ‘च्या पहिल्या भागात चैतूची आई त्याच्याशी न बोलताच निघून गेली होती. आता चैतू त्याच्या आईला भेटण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहे.

‘नाळ’च्या (naal 2) पहिल्या भागात ‘चैतू’ची आई त्याच्याशी न बोलताच निघून गेली. आता चैतू त्याच्या आईला पश्चिम महाराष्ट्रात भेटायला जाणार आहे. मात्र आता इतकी वर्षं झाल्यानंतर त्यांच्यातील हा दुरावा निवळेल का? चैतू त्याच्या आईकडे येईल का? त्यांच्यातील हा अबोला संपेल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले असतील. परंतु या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना 10 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात मिळणार आहेत.

नुकतेच या चित्रपटाचे दुसरे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटाचे दुसरे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. टिझरमध्ये चैतू त्याच्या आईला शोधत आहे. त्याला आईच्या खुणा मिळत आहेत. टिझर पाहाता चैतू आणि त्याच्या आईच्या नात्याची नाळ जुळेल का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. टिझर पाहाता चैतू त्याच्या आईबरोबर दिसत आहे, मात्र त्यांच्या नात्याची नाळ जुळली आहे का, हे अद्यापही अनुत्तरित आहे. याचा उलगडा आता लवकरच होणार आहे. ‘नाळ भाग 2’च्या पहिल्या टिझरलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भिंगोरी’ गाणेही सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.

‘आई मला खेलायला जायचंय’ या गाण्याप्रमाणेच ‘भिंगोरी’ या गाण्याचे व्ह्यूजही दिवसेंदिवस वाढत आहेत. झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ भाग २’चे सुधाकर रेड्डी यंक्कट्टी दिग्दर्शक आहेत. ‘नाळ’ ने प्रेक्षकांशी नाळ जोडली. राष्ट्रीय पुरस्कारावरही मोहोर उमटवली. आता ‘नाळ भाग 2’ लवकरच पहिल्या भागातील आठवणींचा खजिना मोठा चैतू पुन्हा उलगडणार आहे. त्यामुळे येत्या दिवाळीत ही नात्यांची नाळ अधिकच घट्ट होणार आहे. (Famous Director nagraj manjule produced naal 2 second teaser released will chaitu mother speak with him)

आधिक वाचा-
मराठमोळ्या अभिनेत्रीचं राहुल द्रविडसोबत आहे खास नातं? सोशल मीडियावर फोटो व्हायरल
मासिक पाळीत काय करायचं? नाट्यगृहाच्या अवस्थेवर संतापल्या निवेदिता सराफ; म्हणाल्या…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा