Saturday, June 29, 2024

प्रसिद्ध फिल्ममेकरचा रस्त्यावर तडफडून मृत्यू; मदत करायचं सोडुन लोकांनी त्याला लुटलं आणि…

गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अनेकांचे मृत्यूव झाले आहे. नुकतीच मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतील ट्रॅफिक सिग्नलवर प्रसिद्ध डॉक्युमेंटरी फिल्ममेकरचा अपघात झाले आहे. या अपघातात फिल्ममेकर गंभीर जखमी झाले आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

झालं असं की, दक्षिण दिल्लीतील ट्रॅफिक सिग्नलवर 28 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता झालेल्या अपघातात प्रसिद्ध डॉक्युमेंटरी फिल्ममेकर पियुष पालचा (Piyush Pal Accident) अपघात झाला. अपघातादरम्यान पियुषची मोटारसायकल लेन बदलत असताना त्याच्या पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्याला धडक दिली. या अपघातात पियुष गंभीर जखमी झाले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते की, पियुषची मोटारसायकल लेन बदलत असताना त्याच्या पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्याला धडक दिली. या धडकेमुळे पियुषची मोटारसायकल घसरली आणि काही मीटर रस्त्यावर त्याला खेचत नेताना दिसते. पियुष गुरुग्राममध्ये फ्रीलान्स फिल्ममेकर म्हणून काम करत होते. तो दक्षिण दिल्लीतील कालकाजी येथे राहत होता. पियुषच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबासह फिल्म इंडस्ट्रीत शोक व्यक्त होत आहे.

पियुषच्या मित्रांनी आरोप केला आहे की, अपघातादरम्यान रस्त्याने जाणाऱ्यांनी मदत केली असती तर पियुषचा जीव वाचला असता. त्यांनी सांगितले की, पियुष पडलेला असताना कोणीही त्याला मदत केली नाही. तो 20 मिनिटांपेक्षा जास्त काळ रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात लोळत होता. अशावेळी लोकं त्याचे फोटो क्लिक करण्यासाठी त्याच्याभोवती गर्दी करुन उभे होते. त्याचा मोबाईल फोन आणि गो-प्रो कॅमेराही चोरीला गेल्याचे मित्रांनी सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी बंटी नावाच्या दुसऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. पियुष पाल हे एक प्रतिभावान फिल्ममेकर होते. त्याने अनेक डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवल्या आहेत. त्यांच्या मृत्यूने फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. (Famous filmmaker Piyush Pal died after being crushed on the road)

आधिक वाचा-
‘एक दिवस ती नक्कीच माझी पत्नी होईल’, ‘अशी’ आहे ‘मिस इंडिया’ स्वरूप अन् परेश यांची लव्हस्टोरी
तीन प्रसिद्ध अभिनेत्यांशी अफेअर असूनही मिळाले नाही खरे प्रेम, आजही अविवाहित आहे राणी चॅटर्जी

हे देखील वाचा