Tuesday, June 25, 2024

बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध फिल्ममेकरला मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये समन, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये सुकेश चंद्रशेखरला अटक झाल्यानंतर आता त्याच्या चौकशीमध्ये अनेक बड्या लोकांची नावे समोर येत आहेत. यातच आता अजून एक नाव समोर आले आहे, आणि ते नाव म्हणजे बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपटनिर्माते करीम मोरानी. करीम मोरानी यांचे नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर आता ईडी कडून त्यांना समन पाठवण्यात आला आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुकेशाकडून पाठवण्यात येणाऱ्या गिफ्ट्सच्या प्रकरणात करीम मोरानी यांचे नाव समोर आले आहे. आता याच प्रकरणात करीम मोरानी यांना पुढच्या एक किंवा दोन दिवसांमध्ये ईडी समोर चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.

करीम मोरानी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध फिल्ममेकर असले तरी ते नेहमीच विविध वादांमुळेच चर्चेत राहिले. त्यांनी चेन्नई एक्सप्रेस आणि रा. वन आदी चित्रपट बनवून एक वेगळी ओळख निर्माण केली. याआधी देखील करीम मोरानी अनेक वादांमध्ये अडकले आहेत. 2 जी स्पेक्ट्रम प्रकरणात, २०१७ साली दिल्लीच्या २५ वर्षीय विध्यार्थिनीसोबत झालेल्या बलात्कार प्रकरणात हैद्राबाद पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला होता. पुढे २३ सप्टेंबर २०१७ ला करीम मोरानी यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने कथित बलात्कार प्रकरणात ऍंटीसिपेटरी जामीन द्यायला देखील नकार दिला होता. त्यानंतर त्यांना हैद्राबाद पोलिसांकडे जाऊन स्वतःला सरेंडर करावे लागले होते. आता करीम मोरानी यांची ईडीकडून चौकशी झाल्यानंतरच अधिक महिती समजेल.

दरम्यान सुकेश चंद्रशेखरबद्दल सांगायचे झाले तर तो सध्या दिल्लीच्या मंडळी जेलमध्ये बंद आहे. सुकेशवर २०० कोटी रुपयांचा मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची देखील अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. यातच पिंकी इराणी हे देखील समोर आले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियाला अचानक ठोकला रामराम, पोस्ट शेअर करत दिली माहिती
अत्यंत वादग्रस्त : ‘स्वरा भास्कर जर हजारो पुरुषांसोबत रात्र घालवणार…’, अयोद्धेतील महंताच्या विधानाने खळबळ

हे देखील वाचा