Wednesday, February 21, 2024

सर्वांच्या लाडक्या पूजा-वैभवचा ‘एक लाजरा नं साजरा मुखडा…’ गाण्यावरचा रोमँटिक डान्स पाहिला का? व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता वैभव तत्त्ववादी यांची जोडी मराठी चित्रपटसृष्टीत नवीन असली तरी, त्यांची फ्रेश केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. या दोघांनी ‘चिटर’ आणि ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटांमुळे खऱ्या आयुष्यातदेखील पूजा आणि वैभवमध्ये छान मैत्री जुळून आली आहे. पूजा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.पूजा सावंत आणि वैभव तत्त्ववादी दोघेही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत.

पूजा (Pooja Sawant ) आणि वैभव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमी एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच पूजा-वैभवने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक रोमँटिक डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही एका सदाबहार मराठी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्यांच्या या रोमँटिक डान्सने प्रेक्षकांना खूप आवडला आहे.

या व्हिडिओमध्ये पूजाने गुलाबी रंगाचा कुर्ता घातला आहे आणि वैभव तत्त्ववादी नारंगी रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहेत. ते दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ते उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांच्या आवाजात ‘एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं’ या गाण्यावर डान्स करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करून पूजा आणि वैभवच्या डान्सची प्रशंसा केली आहे. काही नेटकऱ्यांना या दोघांच्या रोमँटिक केमिस्ट्रीची खूप आवडली आहे.

 त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “मला तुमची जोडी खूप आवडते” तर दुसऱ्याने लिहिले की, “मॉर्डन लूक आणि रेट्रो गाण्याचं सुंदर मेळ”, त्याचवेळी तिसऱ्याने लिहिले की, “पूजा आणि वैभवची केमिस्ट्री भारीच आहे” अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धूमाकूळ घालत आहेत. (Famous Marathi actress Pooja Sawant and actor Vaibhav Tattvadi romantic dance video on Marathi song goes viral)

आधिक वाचा-
राणी मुखर्जीला नवरंगांची भुरळ! पांढऱ्या साडीत खुलल सौंदर्य
‘या’ प्रसिद्ध माजी मिस वर्ल्डचे निधन; वयाच्या 26व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; जगभरातील चाहते शोकसागरात

हे देखील वाचा