Saturday, September 30, 2023

‘करण आणि शाहरुखच्या सिनेमांमुळे भारतीय संस्कृतीचे नुकसान…’, ‘काश्मिर फाईल्स’ दिग्दर्शकाचे खळबळजनक भाष्य

आपल्या सिनेमांसोबतच बिंधास्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक म्हणजे विवेक अग्निहोत्री होय. अग्निहोत्री नेहमीच अशी विधानं करतात, ज्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा रंगलेली असते. ते बॉलिवूड अभिनेत्यांवरही ताशेरे ओढण्यात मागे-पुढे पाहत नाहीत. अशात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री शाहरुख खान आणि करण जोहरवर संतापले आहेत. यासोबतच त्यांनी सांगितले आहे की, आता कशाप्रकारे सिनेमे बनवले जात आहेत. चला तर, ते काय म्हणालेत जाणून घेऊयात.

काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?
विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी माध्यमांशी बोलताना स्वत:च्या ट्रोलिंगपासून ते सिनेमाबाबत चर्चा केली. ते म्हणाले की, जे जुने ट्वीट्स शोधून आणतात आणि ढोंगी म्हणतात, त्या ट्रोलर्समुळे ते चिंतेत पडत नाहीत. ते त्या लोकांना चॉकलेटचे पॅकेट पाठवू इच्छितात. तसेच, त्यांना धन्यवाद देऊ इच्छितात. कारण, त्याच लोकांनी सांगितले की, ते बदलत आहेत. ते पुढे म्हणाले की, “जेव्हा तुम्ही 2024 किंवा 2025मध्ये दिल्ली फाईल्ससाठी मला भेटाल, तेव्हाही मी त्याच गोष्टी म्हणत असेल, तर मला स्वत:ची लाज वाटली पाहिजे. मी असे आयुष्य जगू शकत नाही, जिथे मी दररोज बदलू शकत नाही. दरदिवशी एका बदलासह नवीन दिवस असतो. मी एक स्थिर आयुष्य जगू इच्छित नाही.”

शाहरुख खान आणि करण जोहरवर निशाणा
विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले की, अनुभव आणि वयासोबत सिनेमाबाबत त्यांचा दृष्टिकोनही बराच बदलला आहे. ते म्हणाले की, ही पहिलाच वेळ आहे की, त्यांनी पूर्ण भारताची यात्रा केली आहे आणि एका चित्रपट निर्मात्याच्या रूपात देश पाहिला आहे. यादरम्यान त्यांना ही जाणीव झाली की, अशा अनेक कहाण्या आहेत, ज्या कोणीही कधीच सांगितल्या नाहीत. त्यांना वाटते की, देशात निर्मात्यांनी केलेला हा सर्वात मोठा गुन्हा आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “करण जोहर आणि शाहरुख खान यांच्या सिनेमांनी भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीला आपत्तीजनकरीत्या नुकसान पोहोचवले आहे.” त्यांच्या मते, वास्तविक आणि प्रामाणिक कहाण्या सांगणे गरजेचे होते, जे अमिताभ बच्चन यांच्या ‘शहेनशाह’ सिनेमानंतर बंद झाली आहे.

नवीन सिनेमा कधी रिलीज होणार?
‘द काश्मिर फाईल्स’ सिनेमाचे दिग्दर्शन करणारे विवेक अग्निहोत्री नवीन सिनेमा घेऊन येत आहेत. त्यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर‘ (The Vaccine War) हा सिनेमा येत्या 28 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाची टक्कर प्रभास (Prabhas) अभिनित ‘सालार’ (Salaar) सिनेमाशी असणार आहे. (director vivek agnihotri said that shah rukh khan and karan johar cinema damaged cultural fabric of india)

महत्त्वाच्या बातम्या-
‘मी काय तुम्हाला हट्ट केला नाही…’, राहुल गांधींचा बायोपिक बघण्याविषयी सुबोध भावेचे लक्षवेधी विधान
अनुपम खेर यांनी केला ‘गदर 2’चा प्रामाणिक रिव्ह्यू; स्पष्टच म्हणाले, ‘सनी देओल अभिनेताच नाही…’

हे देखील वाचा