Saturday, September 30, 2023

लग्नाच्या अगोदर परिणीती आणि राघव चड्डा बाबा महाकालच्या दर्शनाला, मंदिरातील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या चित्रपटांमुळे नाही, तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे माेठ्या प्रमाणात चर्चेत येत आहे. परिणीती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचे फोटो लगेच व्हायरल होतात. परिणीतीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. परिणीती तिच्या अभियापैक्षा तिच्या खाजगी आयुष्यामुळे खूप चर्चेत येते. यादरम्यान तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायर होत आहे.

मंडळी, राघव चड्ढा (Raghav Chadha Videos) आणि परिणीती चोप्राने (Parineeti Chopra)  13मे रोजी दिल्ली येथील कपूरथला येथे एंगेजमेंट केली. त्यांचे अजून लग्न झालेले नाही. लग्ना आगोदरच राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा जोडीने एका मंदिरात दिसले. त्यावेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहूण त्यांच्या चाहत्यांनी आनंद झाला आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.

या व्हिडिओमध्ये परिणीती साडी नेसलेली दिसली तर राघव चढ्ढाही धोतर परिधान करून दर्शनासाठी पोहोचला आहे. यावेळी त्याच्या अंगावर लाल शालही गुंडाळलेली दिसत आहे. महाकाल मंदिराच्या नियमांनुसार, नंदी गृहात जाणाऱ्या पर्यटकांना पारंपारिक पोशाख परिधान करणे बंधनकारक आहे. हा नियम या जोडप्याने देखील पाळला आहे. यासोबतच दोघांनीही नियमानुसार बाबांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले. ज्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raghav Chadha (@raghavchadhaspeaks)

 दरम्यान, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या तारखेकडे चाहते डोळे लावून बसले आहेत. परिणीती आणि राघव हे राजस्थानमध्ये 25 सप्टेंबरला लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नाही तर त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे. त्यांच्या लग्नासाठी कोण कोण सेलिब्रेटी हजेरी लावणार आणि विविह सोहळा कसा पार पडणार हे पाहण रंजक ठरणार आहे. (Parineeti Chopra and Raghav Chadha visit Baba Mahakal before their wedding.)

अधिक वाचा-
यशस्वी सूत्रसंचालिका ते फरहान अख्तरची गर्लफ्रेंड असणाऱ्या शिबानी दांडेकरबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहे का?
शूटिंगदरम्यान नेहा धूपियाने खाल्ल्या होत्या चक्क 35 पाणीपुरी, खऱ्या आयुष्यात खाते इतक्या पाणीपुरी

हे देखील वाचा