Saturday, December 7, 2024
Home बॉलीवूड जॅकलीनच्या ‘त्या’ फोटोवर मिका सिंगने केली कमेंट; म्हणला, ‘ती चांगली अभिनेत्री आहे, पण…’

जॅकलीनच्या ‘त्या’ फोटोवर मिका सिंगने केली कमेंट; म्हणला, ‘ती चांगली अभिनेत्री आहे, पण…’

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध गायक मिका सिंग सतत काही ना काही वक्तव्य करत असतो. त्यामुळ तो चर्चत असतो. यावेळीही असेच काहीसे घडले आहे. जॅकलिन फर्नांडिस ही फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणात गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. अशा स्थितीत अभिनेत्रीचा हा मुद्दा आता गायक मिकाने चर्चेत आणला आहे. जॅकलीन फर्नांडिसने नुकताच एक फोटो शेअर केला होता. त्यावर मिका सिंगने कमेंट केली आहे.

गायक मिका सिंग म्हटले की, “जॅकलिन फर्नांडिस ही एक चांगली अभिनेत्री आहे, पण ती सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणात अडकली आहे. तिने त्याच्यासोबत काय केले ते मला माहित नाही, पण ती एक चांगली व्यक्ती आहे.” मिका सिंगच्या या वक्तव्याने जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा चर्चेत आणले आहे. जॅकलिन फर्नांडिस ही सुकेश चंद्रशेखरच्या खंडणी प्रकरणात साक्षीदार आहे.

 सुकेश चंद्रशेखर हा एक फसवणूक करणारा आहे, ज्याने अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना फसवले आहे.मिका सिंगच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही लोकांनी मिका सिंग यांच्याशी सहमती दर्शवली आहे, तर काही लोकांनी त्यांच्या वक्तव्याला विरोध केला आहे. मिका सिंगने यापूर्वीही अनेकदा विवादास्पद वक्तव्ये केली आहेत.

सुमारे दोन वर्षांपूर्वी जॅकलिनचे नाव फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखरसोबत समोर आले होते. ती सुकेशला डेट करत असल्याचं बोललं जात होतं. मात्र, तिने अशा अफवांचे स्पष्ट खंडन केले आहे. एवढेच नाही तर सुकेशने तिला अनेक महागड्या भेटवस्तूही दिल्या, ज्यांची किंमत करोडोंची होती. सुकेश सध्या 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात बंद आहे. याप्रकरणी अभिनेत्रीची अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. जॅकलिन आणि सुकेशचे काही वैयक्तिक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (Famous singer Mika Singh comment on Jacqueline Fernandez photo is in discussion)

आधिक वाचा-
बॉलिवूडमध्ये तयार झाले गांधीजींच्या विचारांचं दर्शन घडविणारे चित्रपट, एकावर तर पाकिस्तानने घातली होती बंदी
उफ्फ..! मराठमोळ्या हृता दुर्गुळेच्या साडीतील अदा पाहून व्हाल फिदा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा