मुंबईतील नॉन-एसी डबल डेकर बसचा मुंबईच्या रस्त्यांवरून अखेरचा प्रवास झाला. तब्बल 86 वर्षे मुंबईकरांच्या प्रवासाची साथ देणाऱ्याया बसेस आता मुंबईच्या रस्त्यांवर दिसणार नाहीत. त्यांची जागा आता एसी बसेसने घेतली आहे. या बसेसचा अखेरचा दिवस असल्याने त्यांना सजवण्यात आले होते. या बसेसवर रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच, या बसेसवर मुंबईकरांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी पोस्टर लावले होते.
या बसेसचा अखेरचा प्रवास पाहण्यासाठी अनेक मुंबईकरांनी रस्त्यावर गर्दी केली होती. त्यांनी या बसेसना नमस्कार केला आणि त्यांचे आभार मानले. या बसेसच्या अखेरच्या प्रवासाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक मुंबईकरांनी या बसेसच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर नॉन-एसी डबल डेकर बसेसचा प्रवेश 1937 साली झाला. या बसेसने मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीला एक नवीन आयाम दिला. 5 ऑक्टोबरपासून बेस्टच्या ताफ्यातून हटवल्या जाणार आहेत.
यागरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डबल डेकर बसचा (Double Decker Bus) व्हिडीओ विरल भयानी या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावरून चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर अनेक सेलिब्रेटींनी कमेंट केल्या आहेत. मिका सिंगने या बसबद्दलच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. तर भारती सिंगनेही कमेंट केली.
मिका सिंग म्हणाला की, ” माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत’ तर त्याचवेळी कॉमेडियन भारती सिंगने म्हटले की, “बस बंद करू नका, मी अजुन बसले नाहीये.” तिची ही कमेंट चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावेने कमेंट करत लिहिले की, “इतिहासात जमा.”
View this post on Instagram
दरम्यान, या बसेसमुळे मुंबईतील लोकांना शहरातील कोणत्याही भागात सहजपणे प्रवास करता येऊ लागला. नॉन-एसी डबल डेकर बसेस मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनल्या होत्या. या बसेसवर अनेक मुंबईकरांनी आपले बालपण आणि तरुणपण घालवले आहे. 1990 च्या दशकापासून मुंबईत एसी बसेसचा प्रवेश होऊ लागला. एसी बसेसमुळे मुंबईकरांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळाली. यामुळे, नॉन-एसी बसेसच्या मागणीत घट झाली. (celebrity emotional on Non-AC Double Decker Bus last day mika singh bharti singh abhidnya bhave comments on video)
अधिक वाचा-
–धक्कादायक! रिंकू राजगुरूच्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट झाल्या डिलीट? जाणून घ्या काय आहे नेमकं कारण
–Hotness Alert! मौनी रॉयचा सुपरबोल्ड व्हिडीओ पाहून फॅन्सची उडली झोप; दिशा पटानी म्हणाली…