‘आमच्या सारखे तुम्हीपण बेरोजगार झालात का?’ नेटकऱ्याच्या या प्रश्नावर शाहरुखने दिली भन्नाट प्रतिक्रिया


बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान नेहमी या ना त्या कारणांमुळे चर्चेचा विषय बनलेला असतो. शाहरुखने टेलिव्हिजन इंडस्ट्रीपासून त्याच्या अभिनयाच्या करियरला सुरुवात केली होती. त्यानंतर पुढे तो चित्रपटांमध्ये झळकला आणि आज शाहरुख खान इंडस्ट्रीचा किंग बनला आहे. शाहरुख स्वबळावर या ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये आला आणि इथला राजा झाला. नुकतेच शाहरुखने या इंडस्ट्रीमध्ये ३० वर्ष पूर्ण केले आहेत. या ३० वर्षांत त्याने प्रेक्षकांना अनेक दर्जेदार सिनेमे दिले. अनेक चढ उतारांनी भरलेल्या त्याच्या या सिनेप्रवासात त्याचे फॅन्स नेहमी त्याच्यासोबत होते. शाहरुखने देखील अनेकदा त्याचे फॅन्सवरील प्रेम जाहीर केले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारा शाहरुख अनेकदा फॅन्सच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे देताना दिसतो.

नुकतेच शाहरुखने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केले. ज्यात त्याने #AskSrk हा हॅशटॅग वापरत लिहिले होते की, “मी १५ मिनिटांसाठी इथे आहे तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकता”. शाहरुख खानशी चर्चा करायला तर सर्वच तयार झाले आणि त्याच्याशी संवाद साधण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचार लागले. यात त्याला वैयक्तिक आणि व्यावसायिक असे अनेक स्वरूपाचे प्रश्न विचारले गेले.

यातच शाहरुखच्या एका फॅनने त्याला विचारले की, “आमच्या सारखे… तुम्हीपण बेरोजगार झालात का सर.” या ट्वीटला उत्तर देताना शाहरूखचा हजरजबाबीपणा पुन्हा सर्वांना पाहायला मिळाला. त्याने लगेच याला उत्तर देताना लिहिले, “जे काही करत नाही ते..”

याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी या संधीचा फायदा घेत त्यांच्या मनातील प्रश्न शाहरुखला विचारले. एकाने त्याला विचारले, “तुझ्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रॉडक्शन कंपनीमध्ये सध्या काय शिजत आहे?” यावर शाहरुख म्हणाला, ‘काही मसालेदार सिनेमे’. यासोबतच शाहरुखने फॅन्सच्या सर्व प्रश्नांना खूप दिलखुलासपणे उत्तरे दिली. सोबतच त्याच्या काही उत्तरांमध्ये अनेक गुपिते देखील लपलेली दिसली.

शाहरुख लवकरच ‘पठान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा एण्ट्री करणार आहे. या चित्रपटात शाहरूखसोबत दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख अखेरचा २०१८ साली आलेल्या ‘झिरो’ सिनेमात दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फ्लॉप ऍक्टर ठरूनही रॉयल जीवन जगतोय अभिनेता आफताब; तर वयाच्या ३८व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकला लग्नगाठीत

-केरळ हायकोर्टाकडून चित्रपट निर्माती आयशा सुल्तानाला अटकपूर्व जामीन मंजूर; भाजप नेत्याविरुद्ध केले होते वक्तव्य

-कपूर घराण्याचे नियम तोडत करिश्माने केले होते अभिनयात पदार्पण; वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी


Leave A Reply

Your email address will not be published.