‘हाताची घडी तोंडावर बोट!’ अमृता खानविलकरच्या आगळ्यावेगळ्या योगा पोझेसवर उमटतायेत प्रतिक्रिया


मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय राहते. ‘चोरीचा मामला’ फेम अमृता सध्या तिच्या फिटनेसबाबत लाईमलाईटमध्ये आहे. अमृताच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फॅशन आणि डिझायनर साड्यांव्यतिरिक्त जिम आणि व्यायामाचेही बरेच फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतील. यावरून सहज लक्षात येते की, ती तिच्या फिटनेसबद्दलही खूप गंभीर आहे. तिच्या वेगवेगळ्या आणि अनोख्या योगा पोझेसचे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. असेच तिचे काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

आज २१ जून, म्हणजेच योगदिनानिमित्त अमृताने दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यांनी चाहत्यांना थक्क करून सोडलं आहे. यात अमृता योगा करताना दिसत आहे. यातली विशेष गोष्ट म्हणजे, तिची पोझ. यात अभिनेत्रीने अतिशय आगळीवेगळी अशी पोझ दिली आहे. त्यामुळेच हा फोटो वाऱ्याच्या वेगाने इंटरनेटवर पसरतोय.

हे फोटो अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. जे सोशल मीडिया युजर्सकडून चांगलेच पसंत केले जात आहेत. यात तिचा योगा पाहून नेटकऱ्यांसोबत कलाकारही प्रतिक्रिया देत आहेत, तसेच कौतुकही करत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकता की, कशाप्रकारे चाहते तिच्या कौतुकांचे पूल बांधत आहेत. स्वप्नील जोशीने यावर कमेंट करत लिहिलं आहे, “हाताची घडी तोंडावर बोटचं नेटफ्लिक्स व्हर्जन.” अशा बऱ्याच मजेदार कमेंटही या फोटोंवर पाहायला मिळत आहेत.

अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच सचिन कुंडलकरच्या ‘पॉंडिचेरी’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. तिच्यासोबत वैभव तत्ववादी, महेश मांजरेकर आणि सई ताम्हणकर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली बंद

-‘ही’ गोष्ट अधिक प्रिय असल्यामुळे, बॉलिवुड पार्ट्यांमध्ये जाणे टाळतो अक्षय कुमार; अभिनेत्याने स्वत: केला होता खुलासा

-मीडियम शॉर्ट हेअरमध्ये बरीच सुंदर दिसतेय ऋता; नवीन हेअरकट फ्लाँट करताना दिसली अभिनेत्री


Leave A Reply

Your email address will not be published.