Saturday, June 29, 2024

फरहान अख्तर करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण, ‘या’ चित्रपटात मिळाली संधी

फरहान अख्तरने (Farhan Akhtar) मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये प्रवेश केला आहे. फरहान अख्तर मार्वलच्या ‘मिस मार्व्हल’ या मालिकेत दिसणार आहे. ‘मिस मार्वल’मधील फरहान अख्तरचे पात्र उघड झालेले नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, फरहान अख्तर या चित्रपटात पाहुण्याच्या भूमिकेत असू शकतो. फरहान अख्तरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर याबाबचा खुलासा केला आहे.

फरहानने एका बातमीचा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने लिहिले, “मी भाग्यवान आहे की विश्व तुम्हाला वाढण्याची आणि शिकण्याची संधी देते. ही भूमिका करताना मला खूप आनंद झाला.” रिपोर्टनुसार, फरहान अख्तर या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. अशा परिस्थितीत फरहानने बॉलिवूडनंतर आता हॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण केले आहे. फरहानच्या पोस्टवर अनेकजण कमेंट करून त्याचे अभिनंदन करत आहेत.

अभिनेता फरहान खान हॉलिवूडच्या चित्रपटात झळकणार असल्याने त्याची पत्नी शिवानीने पोस्ट शेअर करत हा आनंद व्यक्त केला आहे. फरहानची पत्नी शिबानीने, “मला तुझा अभिमान आहे.” म्हणत याबद्दलचा आनंद व्यक्त केला आहे. ‘मिस मार्वल’ ८ जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिझ्नी प्लस हॉटस्टारवर हिंदी, तमिळ, तेलगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे. वेब सीरिजमध्ये इमान वेल्लानी कमला खानची भूमिका साकारत आहे. कमला खान एक गेमर आणि फॅन फिक्शन राइटर आहे. कमला खानला कॅप्टन मार्वलसारखे बनण्याची इच्छा आहे.

या वेब सिरीजमध्ये अरामिस नाइट, सागर शेख, ऋषी शाह, मोहन कपूर, मॅट लिंट्झ, यास्मिन फ्लेचर, लैथ नकली, ट्रविना स्प्रिंगर आणि निमरा बुक हे कलाकार दिसणार आहेत. दरंम्यान फरहान अख्तर शेवटचा तुफान चित्रपटात दिसला होता. यापूर्वी त्याने ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटातही काम केले होते. आता फरहान जी ‘ले जरा’चे दिग्दर्शन करणार आहे.’जी ले जरा’मध्ये कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाची कथा ‘दिल चाहता है’ सारख्या रोड ट्रिपवर आधारित असेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा