Friday, March 29, 2024

Mother’s Day 2022 | पडद्यावर आईच्या भूमिकेतील ‘या’ अभिनेत्रींनी प्रेक्षकांना दाखवली थक्क करणारी माया

आई म्हणजे मायेचा प्रेमाचा अखंड झरा. प्रत्येकाच्या आयुष्यात जन्म देणाऱ्या आईचे स्थान सर्वात आदराचे असते. त्यामुळेच आईच्या मायेला, प्रेमाला, तिच्या ममतेला कशाचीच सर नसते असे म्हणले जाते. खऱ्या आयुष्यात जसे आईचे स्थान आणि कर्तुत्व मोठे असते. त्याचप्रमाणे मनोरंजन जगतातही पडद्यावर आईच्या भूमिका साकारलेल्या अनेक अभिनेत्री आहेत मालिका आहेत ज्यामधील त्यांचा अभिनय आणि आईच्या मायेची झलक दाखवणारी कथा कोणीच विसरू शकत नाही. ८ मार्च जागतिक मातृदिनानिमित्त पाहूया अशाच काही पडद्यावर गाजलेल्या आईच्या भूमिका. 

तुलसी (‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’)
‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ हा टेलिव्हिजन इतिहासातील सर्वात लोकप्रिय मालिका होती. 2000 मध्ये प्रसारित झालेल्या या मालिकेमधील प्रत्येक पात्र खूप प्रसिद्ध झाले. मात्र या मालिकेतील तुलसीची भूमिका लोकांना सर्वाधिक आवडली. तुलसीची भूमिका स्मृती इराणी यांनी केली होती. आजही बहुतेक लोक त्यांना तुलसीच्या नावाने ओळखतात.

बा (बा, बहू आणि बेबी)
या मालिकेत बा ची ओळख कुटुंबप्रमुख म्हणून करण्यात आली होती. मालिकेध्ये, बा एकट्याने आठ मुलांचे संगोपन करताना दिसली कारण तिचा नवरा मद्यपी होता. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अशांतता असूनही 20 पेक्षा जास्त लोकांच्या कुटुंबाचे पालन करत असल्याचे मालिकेमध्ये सुंदरपणे चित्रित केले आहे. सरिता जोशी यांनी साकारलेली ही व्यक्तिरेखा खूप गाजली. ही मालिका 2005 साली स्टार प्लसवर प्रसारित झाली.

सविता ताई (पवित्र रिश्ता)
सुशांत सिंग राजपूतचा ही टीव्ही मालिका चांगलीच गाजला होती. अंकिता लोखंडे (अर्चना) आणि सुशांत (मानव) या मालिकेमधून प्रसिद्ध झाले. पण या मालिकाेमध्ये एक व्यक्तिरेखा देखील होती ज्याने लोकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले होते. ते पात्र सविता ताईंचे होते. या मालिकेमध्ये ती मानवच्या आईच्या भूमिकेत होती. त्यांची ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.

भाभो (दिया और बाती हम)
साल 2011-2016 मध्ये प्रसारित झालेला ही मालिका लोकांना खूप आवडली होती. या मालिकेत संध्या आणि सूरजची कथा दाखवण्यात आली होती. या शोमध्ये भाभोची भूमिका साकारून नीलू वाघेला घरोघरी लोकप्रिय झाली. नीलू मूळची राजस्थानची आहे.

इशिता (ये है मोहब्बते)
मालिकेमध्ये दिव्यांका त्रिपाठीच्या व्यक्तिरेखेला ‘ईशी माँ’ म्हटले जात होते. रुहीच्या प्रेमात पडल्यानंतर, इशिता तिच्या घटस्फोटित वडिलांशी लग्न करण्याचा निर्णय घेते जेणेकरून ती आपल्या मुलीशी जवळीक साधू शकेल. या मालिकेमध्ये इशिता केवळ रुहीचीच नाही तर सावत्र मुलगा आदित्यचीही चांगली आई बनल्याचे दाखवण्यात आले आहे. तिची ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. या मालिकेनंतर दिव्यांकाची फॅन फॉलोइंग खूप वाढली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा