Tuesday, July 9, 2024

फरहान-शिबानीच्या लग्नानंतर व्हायरल होतेय पहिल्या बायकोची पोस्ट; म्हणाली, ‘…ब्लॉक करून टाकेन!’

अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) यांच्या शाही विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. फरहानने आपली गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर सोबत मागच्या आठवड्यात विवाह केला होता. या लग्नाचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले होते. आता फरहान अख्तरच्या आधीच्या बायकोची सोशल मीडियावरील पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. यामध्ये ती संतापलेली दिसत आहे. काय आहे हा सगळा प्रकार चला जाणून घेऊ.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू होती. दोघेही अनेक वर्ष एकमेकांच्या प्रेमात होते. यामुळेच दोघांनी लग्न करत कायमचे सोबती होण्याचा निर्णय घेतला होता. दोघांच्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेल्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अभिनेता फरहान अख्तरचा आधीही एक विवाह झाला होता. आता तिची पहिली बायको अधुना भबानीची (Adhuna Bhabani) एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. हे पोस्ट करण्याचे कारण म्हणजे फरहान आणि शिबानीच्या लग्नानंतर अधुनाला नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल करायला सुरुवात केली आहे. ज्यामुळे ती प्रचंड संतापली आहे. या पोस्टमध्ये तिने आपला राग व्यक्त केला आहे.

या व्हायरल पोस्टमध्ये अधुना म्हणते की “जर तुमच्याकडे काही चांगले बोलायला नसेल तर मी तुम्हाला ब्लॉक करत आहे.” अधुनाच्या या पोस्टवरुन ती खूपच संतापलेली दिसत आहे. दरम्यान फरहान आणि अधुना यांनी विवाह केला होता. मात्र त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही. त्यामुळेच त्यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फरहानने शिबानी दांडेकरसोबत विवाह केला. आता शिबानी दांडेकर प्रेग्नंट असल्याच्याही बातम्या रंगल्या आहेत.

हेही वाचा –

हे देखील वाचा