×

‘रईस’च्या प्रमोशनवेळी झाला होता एका व्यक्तीचा मृत्यू, या प्रकरणात शाहरुख खान न्यायालयाचा मोठा निर्णय

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान (Shahrukh Khan) सध्या अनेक वादांमुळे सतत चर्चेत राहायला लागला आहे. मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अंमली पदार्थ सेवन प्रकरणात अटक झाल्यानंतर, शाहरुख खान अडचणीत आला होता. शाहरुख खान त्या दिवसापासून तब्बल चार महिने सोशल मीडियापासून लांब होता. हे प्रकरण बंद होईपर्यंत लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनावेळी झालेल्या वादामुळे शाहरुख खान चर्चेत आला होता. त्यामुळे शाहरुख खानच्या अडचणी काही संपेणात, असेच चिन्हे उभे राहिले आहे. आता ‘रईस’ चित्रपटावेळी झालेल्या एका गुन्ह्याचा निकाल लागला असुन त्यामध्ये शाहरुख खानली दिलासा मिळाला आहे. काय होते हे प्रकरण चला जाणून घेऊ.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

अभिनेता शाहरुख खानचा जानेवारी २०१७ मध्ये आलेला ‘रईस’ चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला होता. चित्रपटातील शाहरुख खानच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. मात्र यावेळी चित्रपटाच्या प्रमोशनवेळी झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यावेळी अभिनेता शाहरुख खानवर या गुन्ह्यासाठी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. हेच आरोप रद्द करण्यासाठी शाहरुख खान सध्या कोर्टाचे दरवाजे ठोठावत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु होते. यावेळी शाहरुख खान मुंबईवरून दिल्लीला जाणाऱ्या रेल्वेत प्रमोशन करत होता. रेल्वेत शाहरुख खानचे बुकिंग नसुनही त्याने रेल्वेत प्रवेश मिळवला होता. रेल्वे जेव्हा वडोदरा स्टेशनवर फ्लॅटफॉर्म नंबर ८ वर थांबली, त्यावेळी शाहरुख खानने चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी समोर झालेल्या गर्दीत टी शर्ट आणि चेंडू फेकले होते. शाहरुख खानने फेकलेले टी शर्ट उचलण्यासाठी समोरच्या गर्दीची झुंबड उडाली. यावेळी इतकी गर्दी झाली की शेवटी पोलिसांना लाठीमार करावा लाागला. याचवेळी या लाठीचार्जमध्ये एका इसमाचा मृत्यू झाला होता. याचविरोधात मृत व्यक्तीच्या कुटूंबियानी तक्रार दाखल केली होती. ज्यामुळे शाहरुख खानच्या अडचणी वाढल्या आहेत

आता या संपूर्ण प्रकरणावर निकाल देताना गुजरात न्यायालयाने मृत व्यक्तीला आधीपासुनच त्रास होता यामध्ये शाहरुख खानची काहीच चूक नसल्याचे स्पष्ट केले आहे. जर त्यांची इच्छा असेल शाहरुख खान माफी मागेल, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे शाहरुख खानला दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा –

हेही पाहा-

Latest Post