Thursday, June 13, 2024

कोण आहे महिमा मकवाना? जिला मिळाला सलमान खानच्या ‘अंतिम’ चित्रपटातून ब्रेक

सुपरस्टार सलमान खान आणि आयुष शर्माच्या ‘अंतिम’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला असून त्यामध्ये सलमान आणि आयुष एकमेकांचा सामना करताना दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही त्या दोघांच्या दुश्मनीशिवाय आयुष आणि महिमा मकवाना यांच्यातील केमिस्ट्री देखील दिसून आली आहे.

चित्रपटाचा ट्रेलर पाहून सगळ्यांच्या मनात आता एक प्रश्न निर्माण झाला असेल की, महिमा मकवाना ही नक्की कोण आहे? तर महिमा ही 24 वर्षीय भारतीय टेलिव्हिजनवरील एक अभिनेत्री आहे. तिला सलमान खानच्या ‘अंतिम’ चित्रपटातून ब्रेक मिळाला आहे. महिमाचा जन्म 5 ऑगस्ट, 1999 रोजी मुंबईमध्ये झाला असून ती लहानाची मोठी देखील तिथेच झालीये. ती लहान असतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. तिच्या वडिलांचे निधन जेव्हा झाले, तेव्हा ती फक्त पाच महिन्यांची होती. तिची आई माजी समाजसेविका आहे आणि त्यांनीच तिला आणि तिच्या भावाला सांभाळले होते.

महिमाचे माध्यमिक शिक्षण मुंबईमधील मेरी इमॅक्युलेट गर्ल्स हाय स्कूलमध्ये झाली आहे आणि सध्या ती ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स एँड कॉमर्समधून मास मीडियामध्ये ग्रॅज्युएशन करत आहे. ती केवळ दहा वर्षाची असताना तिने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती, तेव्हा ती एका ऍडमध्ये दिसली होती. तिला टेलिव्हिजनवरील कलर्स वहिनीवर ‘मोहे रंग दे’ या मालिकेतून मोठा ब्रेक मिळाला होता.

तिने ‘मिले जब हम तुम’, ‘सीआयडी’, ‘आहट’ सारख्या मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत, आणि ‘झांसी की राणी’मध्ये बालकलाकार म्हणूनही काम केले होते.

तसेच ती ‘बालिका वधू’ या मालिकेमध्ये ‘गुडिया’च्या भूमिकेतही दिसली होती. तिथे तिने आनंदीच्या मैत्रिणीची भूमिका निभावली होती. यानंतर तिने ‘सपने सुहाने लडकपन के’, ‘दिल की बातें दिल ही जाने’, ‘प्यार तुने क्या किया’ आणि ‘रिश्तों का चक्रव्ह्यू’ यासह अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

महिमाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले होते. तिने 2017 मध्ये ‘वेंकटपुरम’ आणि नंतर ‘मोसागल्लू’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर 2019 मध्ये, ती ‘टेक 2’ या शॉर्ट फिल्ममध्ये दिसली, ज्यामध्ये तिने ‘नताशा’ची भूमिका निभावली होती. तसेच ती ‘रंगबाज सीजन 2’मध्ये डिजिटल स्पेसमध्ये आणि 2020मध्ये ‘फ्लॅश’.या वेब शोमध्ये दिसली होती.

अधिक वाचा- 
दुःखद! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन; लगेच वाचा
‘जाने क्यू लोग प्यार…’ गाण्यावरील अक्षया देवधर आणि हार्दिकचा व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले…

हे देखील वाचा