Monday, July 1, 2024

‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात आलियाने केला ‘चिकनी चमेली’वर डान्स; नेटकरी म्हणाले, ‘माफी मागा कॅटरिनाची’

बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट शुक्रवारी (दि. 09 सप्टेंबर) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर काय होणार, हे येणारा काळच सांगेल. दरम्यान, लोकांनी चित्रपटाच्या काही क्लिप व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. एका व्हिडिओमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघेही कॅटरिना कैफ हिच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यामध्ये रणबीर-आलियाची केमिस्ट्री काहींना आवडली आहे, तर काहींनी त्यांना ट्रोल केले आहे.

‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) प्रदर्शित होताच या चित्रपटातील काही क्लिप सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. यावर लोकांच्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. एका व्हायरल ट्विटमुळे आलिया ट्रोल झाली आहे. त्यात आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने या गाण्याचे वाटोळं केल्याचं म्हटले जात आहे. ‘तिने कॅटरिना कैफ (Katrina Kaif)  हिची माफी मागितली पाहिजे,’ अशी युजर्सनी मागणी केली आहे. सोशल मीडियावर काही लोक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत, तर काही याला ‘डिजास्टर’ म्हणत आहेत. अनेक ट्विटमध्ये, चित्रपटाच्या ‘VFXला लेझर शो’ आणि ‘बालचित्रपट’ असे वर्णन केले आहे.

एका युजरने चित्रपटाचे तिकीट साेशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, “करण जोहर माझे पैसे परत कर, ब्रह्मास्त्रने मला निराश केले.” दुसऱ्या एका युजरने मजेशीर प्रतिक्रिया देत लिहिले की, “माहीत नाही चित्रपटाने कुठे मार खाल्ला.” तेच अजून एका युजर्सने लिहिले. “ओह हे काय बघितलं.” एका चाहत्याने रणबीर कपूरच्या ‘ए दिल है मुश्किल’ या गाण्याचे बोल ‘अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना’ लिहिले.

या चित्रपटात शाहरुख खानचा कॅमिओ आहे. शाहरुखच्या चाहत्यांना त्याची भूमिका खूप आवडली आहे. शाहरुखची क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याचे कळत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे बजेट 410 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अयान मुखर्जीने या चित्रपटात जवळपास 10 वर्षे मेहनत घेतली आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या शूटिंगपासूनच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या नात्याची सुरुवात झाली हाेती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
सुनील शेट्टीने ‘हेरा फेरी’ अंदाजात अक्षयला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’
शुबमन गिलच्या मित्राने फोडलं भांडं! वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना घेतलं ‘सारा’चं नाव; पण चाहते गोंधळात
विमानतळावर अचानक धावायला लागली अभिनेत्री काजोल, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
‘द कपिल शर्मा शो’चा प्रोमो शूट केल्यानंतर चंदन प्रभाकरने साेडला शो, कृष्‍णा अभ‍िषेक देखील दिला डच्चू

हे देखील वाचा