Wednesday, June 25, 2025
Home अन्य आनंदाची बातमी! टोकियो ऑलम्पिकमध्ये मेडल मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूवर बनणार चित्रपट

आनंदाची बातमी! टोकियो ऑलम्पिकमध्ये मेडल मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूवर बनणार चित्रपट

बायोपिक हा विषय सध्या बॉलिवूडमध्ये खूपच गाजताना दिसत आहे. अनेक महान आणि दिग्गज लोकांचे आयुष्य पडद्यावर उतरवायला बऱ्याच दिग्दर्शकांना आवडते. आजपर्यंत आपण चित्रपटाच्या माध्यमातून अनेक मोठ्या लोकांचे चरित्र पाहिले आहे. क्रिकेटपटू, कलाकार, खेळाडू, आदी विषयांवर बायोपिक आपण पाहतो. जेव्हा एखादी व्यक्ती थोर कर्तृत्व गाजवते किंवा आधीच एखाद्या व्यक्तीच्या नावे मोठे कर्तृत्व आहे, ज्यांनी देशाची मान उंचावली आहे, अशा अनेक लोकांवर या बायोपिक बनतात. कधी कधी तर काही लोकांबद्दल आजच्या पिढीला माहितही नसते, मात्र याच बायोपिकमुळे अशा महान लोकांची ओळख जगाला होते.

याच महान लोकांमध्ये आता ऑलम्पिकमध्ये सिल्वर पदक मिळवणाऱ्या मीराबाई चानूचा देखील समावेश झाला आहे. मीराबाई चानूवर एक मणिपुरी चित्रपट बनवण्याची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या बायोपिकसाठी मीराबाई चानू आणि इंफाळ सेउती फिल्म्स प्रॉडक्शन्स यांच्यामध्ये नोंगपोक काकचिंग येथे एक करार करण्यात आला आहे. निर्मिती कंपनीचे अध्यक्ष असणाऱ्या मनाओबी एमएम यांनी याबद्दल माहिती दिली आहे. मनाओबी एमएम यांनी सांगितले की हा सिनेमा इंग्लिश आणि भारतातील इतर भाषांमध्ये डब केला जाणार आहे. (film to be made on life of tokyo olympics silver medal winner mirabai chanu)

मनाओबी एमएम यांनी सांगितले की, “आता आम्ही अशा एका मुलीच्या शोधात आहोत, जी मीराबाई चानूची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने साकारू शकते. ती मुलगी थोडीफार मीराबाई यांच्यासारखी देखील दिसली पाहिजे. मुलगी मिळल्यानंतर तिला चानू यांच्या जीवनशैलीबद्दल आणि कामाबद्दल प्रशिक्षण दिले जाईल. शूटिंग सुरु होण्यासाठी कमीत कमी सहा महिने तरी लागतील.

मीराबाई चानूने सध्या टोकियोमध्ये सुरु असणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंग प्रकारात भारताला सिल्वर मेडल मिळवून देणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. चानूच्या विजयाने भारताला वेटलिफ्टिंग प्रकारात ४९ किलोग्राम प्रकारच्या २१ वर्षानंतर मेडल मिळवून दिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रियांका चोप्रा ते स्वरा भास्करपर्यंत, बॉलिवूड इंडस्ट्रीतील ‘ही’ रहस्ये वाचून उंचावतील तुमच्या भुवया!

-प्रार्थना बेहेरेच्या ‘आपली यारी’ गाण्याला रसिकांचा तुफान प्रतिसाद; दोन दिवसातच ओलांडला २ मिलियन व्ह्यूजचा टप्पा

-फ्रेंडशिप डे स्पेशल: बॉलिवूडमधील या कलाकारांची मैत्री पाहून तुम्हालाही वाटेल हेवा, करण-काजोलही आहेत यादीत सामील

हे देखील वाचा