Tuesday, July 21, 2026
Home अन्य ‘द कपिल शर्मा शो’ विरुद्ध एफआयआर दाखल; पण का?

‘द कपिल शर्मा शो’ विरुद्ध एफआयआर दाखल; पण का?

चाहत्यांना खदखदून हसवणारा शो म्हणून ‘द कपिल शर्मा शो’ला ओळखले जाते. काही महिन्यांपूर्वीच या शोने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी धडाक्यात पुनरागमन केले आहे. मात्र, आता कपिल शर्मा आणि शोचे निर्माते आपल्या कलाकारांमुळे अडचणीत सापडताना दिसत आहेत.

मध्यप्रदेशच्या शिवपुरी जिल्हा न्यायालयात सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘द कपिल शर्मा शो’चा एक एपिसोड पाहिल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत असा आरोप लावण्यात आला आहे की, एका एपिसोडमध्ये शोचे काही कलाकार मंचावर उघड्यावर मद्यपान करत अभिनय करत आहेत. विशेष म्हणजे, त्या बॉटलवर स्पष्टपणे लिहिले आहे की, ‘दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.’ (FIR Against The Kapil Sharma Show In Shivpuri Madhya Pradesh For Showing Actor Drinking In Courtroom Set)

१ ऑक्टोबरला होणार प्रकरणाची सुनावणी
तक्रार करणाऱ्या वकिलाने शिवपुरीच्या सीजेएम न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. वकिलांचे म्हणणे आहे की, “सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा ‘कपिल शर्मा शो’ खूपच ढिसाळ आहे. शोच्या मंचावर न्यायालयाचे सेट उभारण्यात आले आणि सार्वजनिकरीत्या मंचावर कलाकारांनी मद्यपान केले. हा कायद्याचा अपमान आहे. त्यामुळे दोषींविरुद्ध मी ३५६/३ कलमानुसार तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे.”

मुलींवरही केले वादग्रस्त वक्तव्य
वकिलांनी सांगितले की, शोमध्ये मुलींवरही वादग्रस्त वक्तव्य केले जातात. ते पुढे म्हणाले की, अशाप्रकारच्या प्रदर्शनावर बंदी घालणे गरजेचे आहे.

शिवपुरीच्या वकिलांनी या तक्रारीत १९ जानेवारीच्या त्या एपिसोडचा समावेश केला, ज्याचा २४ एप्रिल, २०२१ रोजी पुनर्प्रसारण करण्यात आले होते. वकिलांनी सांगितले की, शोमध्ये न्यायालयाचा सेटअवर लावून शोच्या एका पात्राला मद्यपान करताना दाखवण्यात आले. वकिलांनी म्हटले की, या एपिसोडमध्ये न्यायालयाचा अपमान झाला आहे.

‘द कपिल शर्मा शो’चे सूत्रसंचालन कपिल शर्मा करतो. त्याच्याव्यतिरिक्त या शोमध्ये सुमोना चक्रवर्ती, भारती सिंग, कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी आणि अर्चना सिंग यांचाही समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-TMKOC: एकेकाळी कर्जात पूर्णपणे बुडाला होता ‘सोढी’; मग कर्जदारांपासून वाचण्यासाठी केलं ‘हे’ काम

-लग्नानंतर प्रथमच बिकिनीमध्ये दिसली दिशा परमार; मालदीवमध्ये पती राहुलसह करतेय सुट्ट्या एन्जॉय

-‘मनिके मागे हिते’ गाण्याची लोकप्रियता पोहचली शिगेला; इंग्रजी, हिंदी, तामिळ अन् आता भोजपुरी व्हर्जनही झालं रिलीझ

हे देखील वाचा