राडा, रडारड आणि बरंच काही.!! प्लॅन इतका परफेक्ट होता की, मांडवात जाऊन ‘तिचं’ लग्न मोडलं; नंतर स्वतः बाशिंग बांधलं

राडा, रडारड आणि बरंच काही.!! प्लॅन इतका परफेक्ट होता की, मांडवात जाऊन 'तिचं' लग्न मोडलं; नंतर स्वतः बाशिंग बांधलं


बॉलिवूडमधील जोडप्यांच्या प्रेमाच्या कथा नेहमीच चर्चिल्या जातात. मात्र, या सर्वांत सर्वकालीन ज्यांची चर्चा होती, असे जोडपे म्हणजे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी. आजही जेव्हा जेव्हा बॉलिवूडमदील या दोन कलाकारांच्या जीवनप्रवासाच्या गोष्टी सांगितल्या जातात. तेव्हा प्रेक्षकही एकरूप होऊन ते ऐकत असतात.

आज आपण त्यातील असाच एक किस्सा पाहणार आहोत, जो की हेमा मालिनीच्या लग्नावेळी झाला होता.

एका छोट्याशा गावापासून ते बॉलिवूडपर्यंतचा त्यांचा प्रवास काही सोप्पा नव्हता. तरी त्यांनी हार मानली नाही. आणि बॉलिवूडमध्ये आपल नावं कमावल. धर्मेंद्र यांच्या आयुष्यातील यश आणि आणि अनेक वादामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. तर जाणून घेऊयाच त्याच्या आयुष्यातील ती महत्वाची घटना.

धर्मेंद्र याचा जन्म पंजाबमधील नरसाली या छोट्याशा गावात झाला होता. वयाच्या 19 वर्षांचे असतानाच त्यांनी प्रकाशकौर यांच्यासोबत लग्न केले होते. तेव्हा त्यांनी बॉलिवूडमध्ये पाय देखील ठेवला नव्हता. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना दोन मुले झाली. परंतु जेव्हा त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा ते हेमा मालिनीवर प्रेम करू लागले.

हेमा मालिनी या धर्मेंद्र व्यतिरिक्त जितेंद्र आणि संजीव कुमार यांना देखील आवडत होत्या. आणि त्यांना हेमासोबत लग्न करण्याची देखील इच्छा होती. त्यावेळी अशी बातमी पसरली होती की, जितेंद्र आणि हेमा हे दोघे चेन्नईमध्ये लग्न करणार आहे. परंतु जितेंद्र तेव्हा शोभा कपूर हिच्या सोबत रिलेशनमध्ये होते.

परंतू, जेव्हा हेमा मालिनी आणि जितेंद्र यांच्या लग्नाची बातमी धर्मेंद्र यांच्या कानावर गेली. तेव्हा ते भडकले. आणि शोभा यांना घेऊन घेऊन मद्रासला गेला. तिथे जाऊन शोभाने खूपच गोंधळ घातला. आणि त्या दोघांचे लग्न मोडलं.

नंतर संधी साधत धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांना प्रपोज केले. परंतू, लग्न करताना त्यांना खूपच अडचणीचा सामना करावा लागला. धर्मेंद्र यांचे आधीच लग्न झाले होते. त्यात ते हिंदू होते, त्यामुळे त्यांना दुसरे लग्न करण्यास मान्यता नव्हती. त्यामुळे त्यांनी इस्लाम हा धर्म स्वीकारला आणि हेमा मालिनी सोबत लग्न केले.


Leave A Reply

Your email address will not be published.