सिनेसृष्टीत सध्या लगिन घाई पाहायला मिळत आहे. दाक्षिणात्य दाक्षिणात्य अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet singh) लवकरच आपला बायफ्रेंड जॅकी भगनानीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीच्या घरी प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे., सोशल मीडियावर लग्नप्रत्रिका व्हायरल झाली असून रकुल आणि जॅकी या दोघांवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. यांच्या लग्नाला अवघे काहीच दिवस उरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून २१ फेब्रुवारीला लग्न करणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला आहे.
रकुल आणि जॅकीच्या लग्नाची प्रत्रिक सोशल मिडियावर व्हायरल झाली असून दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. दोघे गोव्यामध्ये लग्न करणार असून लग्नपत्रिकेची थीम देखील तशीच ठेवली आहे.
रकुल जॅकीच्या लग्नपत्रिकेने वेधले लक्ष
लग्नपत्रिकेची थीम सफेद आणि निळ्या रंगाची आहे. पत्रिकेवर समुद्र किनारा नारळाची झाडं दिसत आहे. यासोबत निळ्या रंगाचा सोफा त्यावर कुशन्स पाहायला मिळत आहेत. समुद्राच्या पुढे सजलेला मंडप पाहायला मिळत आहे. दुसऱ्या पेजवर त्यांनी तारीख लिहिली आहे. ते २१ फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहेत. त्यांचं लग्न गोव्याला होणार आहे.
रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानीने आधी मिडिल ईस्टमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांनी त्यांच्या लग्नाचं ठिकाण बदललं. देशातच लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अभिनेत्रीच्या लग्नाची चाहत्यांना आता उत्सुकता लागली आहे.
जॅकी आणि रकुल यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात लॉकडाऊनमध्ये झाली होती. म्युच्युअल फ्रेंड्सच्या माध्यमातून ते एकमेकांना भेटले होते. तिथूनच त्यांच्या मैत्री आणि नंतर प्रेमाला सुरुवात झाली. 2021 मध्ये जॅकी आणि रकुलने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.
अभिनयाच्या जोरावर रकुलने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर रकुल मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना आपडेट देत असते. चित्रपटांव्यतिरिक्त रकुल आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. आत्तापर्यंत तिने साऊथच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘यारिया’ चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. लवकरच तिचा ‘इंडियन २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर कमल हासन यांची प्रमुख भूमिका आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
बिग बॉस फेम मनारा अन् अभिषेक रोमँटीक अंदाजात, ‘सांवरे’ सॅांग लॉन्च
‘तिला माझं प्रत्येक दुःख माहित आहे..’ अंकिताने केला कंगना आणि तिच्या घट्ट मैत्रीचा खुलासा