Wednesday, July 3, 2024

पालथ्या घड्यावर पाणी! जबरदस्त स्टारकास्ट असूनही सपशेल फ्लॉप ठरले ‘हे’ सिनेमे

बॉलिवूडमध्ये दर वर्षी कितीतरी चित्रपट प्रदर्शित होत असतात. त्यातील काही चित्रपट प्रेक्षकांना आवडतात तर काही चित्रपटांवर प्रेक्षक नाराजी व्यक्त करतात. बॉलिवूडमधील जवळपास सगळ्याच चित्रपटांचे बजेट खूप जास्त असते. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला तर ठीक नाहीतर निर्मात्यांना खूप मोठा आर्थिक भूर्दंड बसतो. असेच बॉलिवूडमध्ये काही बिग बजेट चित्रपट बनले आहेत. जे प्रत्यक्षात पडद्यावर मात्र जोरदार फ्लॉप झाले. चला तर जाणून घेऊया बॉलिवूडमध्ये असे नेमके कोणते बिग बजेट चित्रपट आले होते, जे बॉक्स ऑफिसवर चांगलेच फ्लॉप झाले.

फितूर
या यादीतील पहिला चित्रपट म्हणजे ‘फितूर.’ बॉलिवूडची बार्बी गर्ल कॅटरिना कैफ आणि आशिकी बॉय आदित्य रॉय कपूरने ‘फितूर’ या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच खूप उत्सुकता होती. हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल ७० कोटी रुपये एवढा खर्च आला होता. परंतु या चित्रपटाला प्रेक्षकांचा काही खास प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपट त्याच्या बजेटच्या निमपट देखील कमाई करू शकला नाही. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ १९ कोटी रुपयांचा गल्ला केला. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांचे खूप मोठे नुकसान झाले.

बॉम्बे वेल्वेट
या बिग बजेट यादीतील पुढचा चित्रपट आहे ‘बॉम्बे वेल्वेट.’ हा एक मल्टी स्टारर चित्रपट होता. या चित्रपटात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांनी मुख्य पात्र निभावली होती. परंतु हा चित्रपट देखील काही खास कामगिरी करू शकला नाही. या चित्रपटाचे बजेट ११० कोटी रुपये एवढे होते. परंतु चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप वाईट पद्धतीने फ्लॉप झाला. चित्रपटाने केवळ २३ कोटी रुपये कमवले.

रॉक ऑन टू
सन २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘रॉक ऑन टू’ हा चित्रपट सुरुवातीपासूनच खूप चर्चेत होता. चित्रपटात श्रद्धा कपूर, फरहान अख्तर आणि अर्जुन रामपाल हे कलाकार होते. हा चित्रपट ५५ कोटीच्या बजेटमध्ये बनवला होता. परंतु या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ ११ कोटी रुपयांचा गल्ला केला.

हिंमतवाला
साजिद खान यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हिंमतवाला’ या चित्रपटात अजय देवगण आणि तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे बजेट तब्बल ७० कोटी रुपये एवढे होते. परंतु त्यांच्यातील केमेस्ट्री प्रेक्षकांना काही खास रुचली नसावी. म्हणूनच या चित्रपटाने केवळ ४५ कोटी रुपयांचा गल्ला केला.

हे आहेत बॉलिवूडमधील बिग बजेट असणारे चित्रपट जे बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबत जोरदार आपटले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
आमिरने जुहीसोबत केले होते किळसवाणे कृत्य, मग तिनेही ७ वर्षे पाहिलं नव्हतं त्याचं तोंड
सैफ अली खानची लेक असूनही साराने का पसरले होते रोहित शेट्टीपुढे हात? थेट ऑफिसमध्ये घुसत…
ज्याच्या स्टाईलवर आख्खं जग होतं फिदा, तोच मायकल जॅक्सन गायचा बप्पी दांचे गोडवे; म्हणालेला…

हे देखील वाचा