Tuesday, May 21, 2024

‘गैंग्स ऑफ वासेपुर’ फेम डेफनिटवर आरोप, रांची पोलिस्टेशनमध्ये गुन्हा दाखल

ओटीटीवरील प्रदर्शित प्रसिद्ध बेवसिरिज ‘गैंग्स ऑफ वासेपुर‘ या सिरिजमधील ‘डेफनिट’ या भूमिकेने प्रसिद्ध झोतात आलेला अभिनेता जिशान कादरी याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांवर भुरळ घातली होती मात्र, नुकतंच या अभिनेत्यावर हॉटेलचं बिल न दिल्यामुळे तक्रार नोंदवली आहे.

‘गैंग्स ऑफ वासेपुर’ फेम डेफनिट उर्फ जिशान कादरी (jishan Quadari) या अभिनेत्यावर एका हॉटोलचे बिल न भरल्यामुळे हॉटेल मालकाने रांचीमध्ये हिंदीपिढी पोलिस स्टेशनमध्ये अभिनेत्याविरोधात फसवणूकीची तक्रार नोंदविण्यात आली आहे. दाखल केलेल्या तक्रारीमध्ये त्याच्यावर 29 लाख रुपयाची फसवणूक केली आहे. ही घटना हॉटेलमध्ये थांबल्यानंतर आणि याचे बिल भरले नाही म्हणून हा वाद जास्तच पेटत गेला.

अभिनेत्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केसल्यामुळे जिशान कादरी खूपच चर्चेत आला आहे. मात्र, त्याच्यावर तक्रार नोंदवने ही काय पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखिल जिशानवर चोरी आणि धोकाधाडीचा आरोप केला होता. त्याशिवय एका महिलेने त्याच्यावर 38 लाख रुपयाची ऑडी कार चोरल्यामुळे आणि लाखोरुपयाच्या फसवणुकीचा आरोप केला होता. त्या महिलेने हेही सांगितले की, जिशानने तिला जिवे मारण्याची धमकी देखिल केली होती. तेव्हा जिशानने सांगितले होते की, ही महिला खोटं बोलत आहे. ती त्याचे नाव खराब करण्याचा पब्लीकली स्टंट करत आहे.

जिशान याने सध्या रांची प्रकरणावर अजून काहीच प्रतिक्रिया नाही दिली. तो नमकं या प्रकरणालाही खोटं म्हणेल का किंवा खऱ्याती साथ देइल हे पाहाने खूप महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडच्या अपयशावर सैफ अली खानने तोडले मौन, सांगितलं ‘हे’ मोठं कारण
‘इतिहास माहिती नसेल तर पुस्तके पाठवतो’, छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने भडकले अमोल कोल्हे, व्हिडिओतून भाजपवर टीका

हे देखील वाचा