Monday, January 19, 2026
Home अन्य Lock Upp | ‘हे’ 16 कलाकार होणार कंगनाच्या ‘लॉकअप’मध्ये कैद, यादी आली समोर

Lock Upp | ‘हे’ 16 कलाकार होणार कंगनाच्या ‘लॉकअप’मध्ये कैद, यादी आली समोर

सध्या ओटीटी फ्लॅटफॉर्मवर फक्त कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) ‘लॉकअप’ या नव्या कार्यक्रमाची जोरदार सुरू आहे. या नव्या कार्यक्रमाची संकल्पना आणि यात काय पाहायला मिळणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. आता या लॉकअपमध्ये सहभागी होणार्‍या अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत, ज्यामध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींचा समावेश आहे.

कंगना रणौत तिच्या ‘लॉकअप’ या कार्यक्रमातून ओटीटीवर पदार्पण करण्यास उत्सुक आहे. या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाच्या ट्रेलरमधूनच यामध्ये बोल्डनेसच्या सगळया मर्यादा पार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोबतच यामध्ये सहभागी होणार्‍या अनेक कलाकारांबद्दल गुप्त बातम्या ऐकायला मिळणार आहेत. आतापर्यंत या कार्यक्रमात कोणते १६ कलाकार सहभागी होणार, याबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागली होती. मात्र आता त्यांचीही नावे समोर आली आहेत.

कंगना रणौतच्या या कार्यक्रमात १६ कलाकार सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये दिव्यांका त्रिपाठी, मानव गोहिल, श्वेता तिवारी, सुरभी ज्योती, उर्फी जावेद, आदित्य सिंग राजपूत, मल्लिका शेरावत, अनुष्का सेन, अवनीत कौर, हर्ष बेनीवाल, शहनाज गिल, वीर दास, पूनम पांडे, निशा रावल, कॉमेडीयन मुन्नवर फारुकी अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाबद्दल कंगना रोज नवनवीन खुलासे करताना दिसत आहे. ‘लॉकअप’मध्ये बोल्डनेस आणि भडक दृश्यांचा तडका पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रम २७ फेब्रुवारी पासून अल्ट बालाजी आणि एमएक्सप्लेवर प्रदर्शित होणार आहे. याआधीच हा कार्यक्रम सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. कार्यक्रमात श्वेता तिवारी, मल्लिका शेरावत, पूनम पांडे, उर्फी जावेद अशा एकापेक्षा एक बोल्ड आणि अतरंगी अभिनेत्रींचा सहभाग आहे. यावरुन हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत राहणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा –

हे देखील वाचा