Tuesday, July 9, 2024

अशोकमामांसोबत ‘गंमत जंमत’ चित्रपटात झळकलेल्या ‘चारुशीला साबळे’ नंतर इंडस्ट्रीतून अचानक झाल्या गायब, आज आहे…

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक विनोदी चित्रपटांनी मराठी प्रेक्षकांच्या गारूड घातली आहे. यातीलच १९८७ मध्ये एक जबरदस्त चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याने सर्वांना हास्याच्या महासागरात नेऊन ठेवले होते. हा चित्रपट म्हणजे ‘गंमत जंमत’ होय. चित्रपटात सचिन पिळगावकर, अशोक सराफ, वर्षा उसगावकर, चारुशीला साबळे, सतीश शहज सुधीर जोशी, श्रीकांत मोघे, आशा लता आणि विजू खोटे यांसारख्या कलाकारांनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. खास गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनीच केले होते. त्यामुळे निवडेलेली पात्र देखील अगदी भन्नाट होती. चित्रपटातील ‘अश्विनी ये ना’ या गाण्याने तर सगळ्यांना अक्षरशः वेड लावले होते. आजही अनेकांच्या ओठावर हे गाणे असते. हे गाणे अशोक सराफ आणि चारुशीला साबळे यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. या गाण्यानंतर चारुशीला यांची सर्वत्र ओळख निर्माण झाली. परंतु सध्या त्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांच्या बाबत काही खास गोष्टी

चारुशीला या शाहिर साबळे यांची मुलगी आहेत. त्या अभिनेत्रीसोबतच एक उत्तम डान्सर देखील आहेत. त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. परंतु ‘गंमत जंमत’ या चित्रपटाने त्यांना त्यांची खास ओळख निर्माण करून दिली. (Gammat jammat movie actress charusheela sable story, let’s know)

https://www.facebook.com/681920175339136/photos/a.681920395339114/681932232004597

चारूशीला साबळे यांच्या करिअरबाबत बोलायचे झाल्यास, त्यांनी १९८२ मध्ये त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

https://www.facebook.com/681920175339136/photos/a.1268976246633523/1268976216633526/

त्यांनी ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘यमाच्या गावाला जाऊ या’, ‘गाव तसं चांगलं’, ‘ऑक्सिजन’ या चित्रपटात काम केले आहे. यासोबतच त्यांनी हिंदी मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

चारूशीला यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, त्यांनी अभिनेता अजित वच्छानी यांच्याशी लग्न केले होते. मात्र, अजित वच्छानी यांचे २५ ऑगस्ट २००३ साली निधन झाले. त्या दोघांना दोन मुली आहेत. त्यांचे नाव योहाना, त्रिशला हे आहेत. त्रिशला एअर होस्टेस आहे, तर योहाना ही देखील एक अभिनेत्री आहे. घर संसार सांभाळताना चारुशीला यांनी मात्र अभिनयक्षेत्राला रामराम ठोकला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तिसऱ्या आठवड्यातही ‘झिम्मा’ हाऊसफुल, सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर केला व्हिडिओ शेअर

‘मीरा आणि मनू’ने धरला ‘नाटु नाटु’ गाण्यावर ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

-लहान वयातच मायरा वैकुळची गरुडझेप, पटकावला ‘हा’ खास पुरस्कार

हे देखील वाचा