लहान वयातच मायरा वैकुळची गरुडझेप, पटकावला ‘हा’ खास पुरस्कार


मराठी टेलिव्हिजनवर अनेक बालकलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या निरागस आणि गोड अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. पण यावर्षी एका अशा बालकलाकाराची ओळख झाली, जिने मालिकेच्या प्रोमोपासूनच प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान निर्माण केले आहे. मालिका सुरू झाल्यापासून तिचे सीन आले की, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच तिचा अभिनय पाहून तिच्या प्रेमात पडतात. ती चिमुकली अभिनेत्री म्हणजे मायरा वैकुळ (Myra Vaikul) होय. मायरा सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत परीच्या भूमिकेत काम करत आहे. या मालिकेत तिच्यासोबत प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे हे कलाकार काम करत आहेत. मालिकेतील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

https://www.instagram.com/p/CW-ijQ7rcAm/?utm_medium=copy_link

मायराने पहिल्याच सीनमध्ये अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. या वर्षीच्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात मायराला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला. तसेच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेला तब्बल १३ पुरस्कार मिळाले. यानंतर मायरा चांगलीच प्रकाशझोतात आली. अशातच मायराला आणखी एक पुरस्कार मिळाला आहे. मायराला लोकमतकडून दिया २०२१ चा सर्वोत्कृष्ट बालकलाकार डिजिटल एन्फ्ल्यूएन्सर हा पुरस्कार मिळाला आहे. (Child artist Myra vaikul got Dia 2021 from lokmat)

तिचे पुरस्कार सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच, मायरा पुरस्कार स्वीकारताना देखील फोटो व्हायरल होत आहे. या पुरस्कार सोहळ्यात मायरा खूपच सुंदर दिसत होते. तिने केशरी आणि निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता. तसेच तिने गळ्यात मोत्याचा हार आणि नाकात नथ घातलेली दिसत आहे. यावेळी मायरा खूपच खुश दिसत होती. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. तेव्हा सगळ्यांनी तिच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि शिव ठाकरे देखील उपस्थित होता. त्यांनी देखील मायरासोबत फोटो शेअर केले आहेत.

खरं तर या निरागस वयात तिला कल्पनाही नसेल की, तिने केवढा मोठा पुरस्कार मिळाला आहे. अनेक वर्ष वाट पाहिल्यानंतर कलाकारांना हा पुरस्कार मिळतो, परंतु तिने अभिनयात पाऊल टाकताच हा पुरस्कार मिळवला आहे, त्यामुळे सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंटिमेट सीन करायचा असेल, तर…’, सुपरहिट ‘झिम्मा’ चित्रपटातील किसींग सीनबाबत सायली संजीवचे मोठे वक्तव्य

-मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा थाटात पडला पार, सूनबाई आहेत ‘या’ क्षेत्राशी निगडित

-ऐकलंत का! गायिका योगिता बोराटेंचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


Latest Post

error: Content is protected !!