‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठची तब्येत नाजूक; हृदयविकाराचा झटका आल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल


अभिनेत्री गहना वशिष्ठ काही काळापूर्वी पॉर्न व्हिडिओच्या बनवण्याच्या संदर्भात चर्चेत आली होती. फेब्रुवारीमध्ये तिला पॉर्न व्हिडिओ बनवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच ती जामिनावर बाहेर आली, मात्र ३ जुलैला गहना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर तिला मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

गहना वशिष्ठचे प्रवक्ता फ्लिन रेमेडियोस यांनी या बातमीला खरे सांगत तिची प्रकृती नाजूक असल्याचे देखील सांगितले आहे. सध्या तिला मशीनवर ठेवण्यात आले आहे. सोबतच फ्लिन यांनी सांगितले की, “गहनाला सोमवारी बरे वाटत होते, पण अचानक पुन्हा तिची तब्येत खराब झाली. माझी सुद्धा अजून तिच्याशी भेट झाली नाही. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, ती आता बिलकुल बोलण्याच्या परिस्थितीत नाहीये. पण ती गंभीर आहे हे नक्की. मी लवकरच तिला भेटायला जाणार आहे.” गहनाचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, तिला याआधी देखील एकदा हार्ट अटॅक आला होता.

गहना वशिष्ठने एक पॉर्न व्हिडिओ शूट करून तो अपलोड केल्यानंतर गहना अचानक चर्चेत आली. याच प्रकरणात तिला फेब्रुवारी महिन्यात अटक झाली होती. गहना आणि तिच्या रॅकेटला मड आयलँडमधील एका बंगल्यावर रेड टाकून पकडण्यात आले. जवळपास पाच महिन्यानंतर दिंडोशी सत्र न्यायालयने तिला जामीन मंजूर केला होता. चौकशी दरम्यान समजले की, मुंबईमध्ये अभिनयात काम मिळवण्यासाठी येणाऱ्या कलाकरांना पैशाचे लालच देऊन ती पॉर्न व्हिडिओ शूट करून घ्यायची आणि त्यांना वीस हजार रुपये दयायची. गहनाच्या अकाऊंटमध्ये जमा असलेले ३६ लाख हे पॉर्न वेबसाइटला सब्सक्राइब केल्यानंतर आले असावे असे पोलिसांना वाटत आहे.

गहनावर सुमारे ८५ पॉर्न व्हिडिओ तयार करून अपलोड केल्याचा आरोप होता. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी गहना नेहमी तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते. माहितीनुसार तिचे स्वतःचे एक प्रोडक्शन हाऊस होते जिथे वेबसिरीजच्या नावाखाली पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार केले जायचे. मात्र तिच्या टीमने या सर्व आरोपांचे खंडन केले आहे.

अभिनेत्री गहना वशिष्ठचे खरे नाव वंदना तिवारी आहे. छत्तीसगढची असलेली गहना २०१२ साली मिस आशिया बिकीनीचा पुरस्कार मिळवण्यात यशस्वी झाली होती. गहनाने अनेक हिंदी आणि तेलगू सिनेमात काम केले आहे. मात्र तिला एकता कपूरच्या ‘गंदी बात’ने प्रसिद्धी मिळवून दिली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.