Saturday, July 6, 2024

रणबीर कपूरने टाळलं आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’वर प्रतिक्रिया देणं, अभिनेत्रीने सांगितले कारण

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामुळे खूप जास्त चर्चेत आली आहे. तिच्या अभिनयाची दाद तिला प्रत्येकाकडून मिळत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी वादाच्या भोवऱ्यात सापडल होता. संजय लीला भंसाली यांच्या दिग्दर्शनाखाली आलियाचा हा पहिला चित्रपट आहे. ती आता सध्या या चित्रपटच्या यशाचा आनंद घेत आहे. गंगूबाईच्या या भूमिकेने प्रक्षकांवर भुरळ पाडली आहे. तिच्या या कामाबद्दल तिचं खूप कौतुक होत आहे. तिचा प्रियकर रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) तिच्या अभिनयावर कशी प्रतिक्रिया दिली, हे जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. पण तिने सांगितले की, रणबीरने तिच्या चित्रपटावर सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पॅपराझींशी बोलताना ती म्हणाली की, “सर्वांना रणबीरची प्रतिक्रिया हवी आहे, पण तो सोशल मीडियावर नाही. त्यामुळे मी त्याच्याबद्दल काहीही बोलू शकत नाही. चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी, मी त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे तुम्हालाही रणबीरची प्रतिक्रिया मिळेल.” यापूर्वी रणबीर तिच्या चित्रपटातील सिग्नेचर पोजची कॅापी करताना दिसला होता. तो तिच्यासारख्या उलटा नमस्कार करताना दिसला होता. आलियाने रणबीरचा फोटोही तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहले की, ‘सर्वोत्तम बॅायफ्रेंड’.

आलिया गंगूबाई चित्रपटात अतिशय नेत्रदिपक अवतारात दिसली आहे. पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तिच्या लूकबरोबर तिच्या दमदार अभिनयाचे फार कौतुक केले जात आहे. तिच्या गरबा डॅान्सनेही तितकाच धुमाकूळ घातला आहे. चित्रपटात तिचे दोन लोकनृत्य आहेत. दोन्ही गाणी उत्कृष्ट आहेत. तिने तिच्या डॅान्सवर खूप मेहनत घेतली आहे. संजय लीला भंसाली यांच्या उत्तम दिग्दर्शनाखाली काम करण्यासाठी तिला अभिनयापासून ते नृत्यापर्यंत प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे. तिचा ‘आर आर आर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती सीताची भूमिका बजावत आहे. हा चित्रपट १८ मार्च २०२२ ला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

हे देखील वाचा