Tuesday, June 18, 2024

ऋतुराज गायकवाडची ‘ती’ पोस्ट व्हायरल; ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने केली भन्नाट कमेंट

भारतीय संघ तसेच चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड हा नेहमीच चर्चेत असतो. तो काही दिवसातच बोहल्यावर चढणार आहे. नुकतीच चेन्नईने आयपीएल 2023चे विजेतेपद पटकावले आहे. काही दिवसांपूर्वी ऋतुराजच्या लग्नाच्या बातम्या समोर आल्या होत्या. तो उत्कर्षासोबत विवाह बंधनात आडकणार आहे. तसेच आयपीएल जिंकल्यानंतर उत्कर्षा ऋतुराजसोबत दिसून आली. त्यावेळीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आयपीएल 16व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने विजेते पद पटकावले आहे. ऋतुराज (Rituraj Gaikwad) सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्याने उत्कृष्ट सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यावर नेटकर्‍यांनी लाईक आणि कमेंटचा पाऊसच पाडला होता. यादरम्यान आता एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ऋतुराजने शेअर केल्या फोटोमध्ये भारताचा माजी कर्णधार, चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार असलेल्या महेंद्रसिगं धोनीबरोबरचा एक फोटो आहे. या फोटोमध्ये ऋतुराज महेंद्रसिगं धोनी आणि त्याची होणारी पत्नी उत्कर्षा बसलेली दिसत आहे. पोस्ट शेअर करताना त्याने कॅप्शन लिहीले की, “माझ्या आयुष्यातील दोन व्हीव्हीआयपी. यासाठी मी देवाचा खरंच खूप आभारी आहे”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruturaj Gaikwad (@ruutu.131)

यावर मराठमोळी अभिनेत्री गौतमी देशपांडेने एक भन्नाट कमेंट केली आहे. ती म्हणाली की, “आयपीएलमधील विजयाबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. तुझ्या आयुष्यातील नव्या प्रवासासाठी तुला खूप शुभेच्छा.” तिच्या या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, ऋतुराज गायकवाड 3 जूनला विवाह बंधनात अडकणार आहे. पण या बातमीला ऋतुराजने दुजोरा दिलेला नाही. (Gautami Deshpande reacted to Rituraj Gaikwad’s post)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अर्जुनला का आवडतात ‘श्रुती’ नावाच्या मुली? अभिनेत्याने स्वत:च केला खुलासा, व्हिडिओ एकदा पाहाच
26 वर्षांनंतर माधुरी अन् करिश्मा दिसल्या एकत्र थिरकताना; व्हिडिओ पाहून युजर्स म्हणाले, ‘शाहरुख सर…’

हे देखील वाचा