Tuesday, May 21, 2024

‘बाथरुमचा दरवाजा बंद करू द्यायचा नाही’, चेन्नईचं घर दाखवत जान्हवीचा मोठा खुलासा

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिची मुलगी जान्हवी कपूर हिने आपल्या दमदर अभिनयने प्रेक्षकांवर वेगळीच छाप पाडली आहे. जान्हवी फक्त अभिनयच नाही तर आपल्या वक्तव्यामुळे देखिल ओळखली जाते. जान्हवीने  ‘धडक’  चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही धमाल करु शकला नाही. मात्र, सध्या जान्हवी आपल्या सोशल मीडियामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते. सतत आपले बोल्ड फोटोज सोशल मीडियावर शेअक करत असते. तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो तुफान व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सतत आपल्या फोटो आणि व्हिडिओमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते. तिचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे. यामध्या तिने तिची आई म्हणजेच दिवंंगत अभिनेत्री श्रीदेवी (Shridevi) हिने पहिली संपत्ती खरेदी केलेल्या घराचा व्हिडिओ बनवत अभिनेत्रीने पूर्ण घर दाखवले आहे. यामध्ये तिने तिच्या बाथरुमच्या लॉकबद्दल सांगितले आहे. घर घेतल्यानंतर  माझ्या रुमच्या बाथरुमला कडी नव्हती. माझी आईने निर्णय घेतला होता की, माझ्या ल्गनानंतर हे घर सजवणार. तिने घर सजवण्यासाठी विदेशातून अनेक गोष्टी आणल्या होत्या. घराचे रिनोवेशन करत असताना देखिल माझ्या बाथरुमला कडी बसवली नाही. ‘कारण श्रीदेवीला या घराच्या बाथरुमचे दरवाजे बंद करु द्यायचे नाही.’ (Because Sridevi does not want to close the bathroom doors of this house)

जान्हवीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये तिने चेन्नईमध्ये स्तिथ घर दाखवले आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी स्वत: पूर्ण घर प्रेक्षकांना दाखवते. तिने घर दाखवत तिने प्रत्येक ठिकाणचा एक एक किस्सा सांगितला आहे. व्हिडिओमध्ये जान्हवी सांगते की, ‘हे घर माझ्या आईने खरेदी केले होते. हे माझ्या आईने घेतलेली पहिली संपत्ती आहे. यामध्ये तिने श्रीदेवीने बनविलेली पेंटिंगही दाखवली आहे.’

 

View this post on Instagram

 

जान्हवी व्हिडिओद्वारे घर दाखवत असताना तिचे वडील बोनी कपूर (Boni Kapoor) यांना श्रीदेवीच्या जुने फोटो दाखवते ते फोटो पाहून भावनिक होतात. ते फोटो श्रीदेवी आणि बोनी कपूरच्या लग्नाचे असतात. श्रीदेवीच्या आठवनी दाखवत असताना जान्हवीच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा होताना दिसून येत आहे. जान्हवीने प्रेक्षकांना खूप उत्साहाने घराशी जोडलेले किस्से सांगितले आहेत. (Janhvi has enthusiastically narrated stories related to the house to the audience)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एक्स बॉयफ्रेंडच्या कॉन्सर्टमधील केंडल जेनरचा ‘तो’ व्हिडिओ पाहाच, सर्वत्र होतोय व्हायरल
घटस्फोटांच्या चर्चांमध्ये मानसी नाईकची नवीन लक्षवेधी पोस्ट; म्हणाली, ‘नातेसंबंध तोडण्यापूर्वी एकदाही…’

हे देखील वाचा