×

काही मिनिटांच्या भूमिकेसाठी अभिनेता योगेश त्रिपाठी घेतो ‘इतके’ मानधन, वाचून उंचावतील तुमच्याही भुवया

‘भाभीजी घर पर है’ या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणार्‍या या कार्यक्रमाची नेहमीच चर्चा होताना दिसते. या कार्यक्रमातील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीच्या आहेत. वेड्याची भूमिका साकारणारे सक्सेना असो किंवा अडाणी अंगूरी भाभी असो. या मालिकेच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र या कार्यक्रमात सगळ्यात जास्त लोकप्रिय भूमिका म्हणजे पोलिसाच्या भूमिकेत असलेल्या दरोगा हप्पु सिंगची. आपल्या केसाच्या स्टाइल पासून बोलण्याच्या मजेशीर लकबीमूळे हे पात्र प्रेक्षकाच्या प्रचंड आवडीचे ठरले आहे. यामुळेच त्यांच्यावर आणखीन एक ‘हप्पु की उलटन पलटन’ नावाचा दुसरा कार्यक्रमही सुरू करण्यात आला आहे.

भलेही हप्पुसिंगची भूमिका साकारणार्‍या योगेश त्रिपाठीवर (yogesh tirpathi) आणखी एक मालिका तयार केली असेल, मात्र त्याला खरी लोकप्रियता ही ‘भाभीजी घर पर है’ याच कार्यक्रमातून मिळाली होती. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केल जातं. त्यांच्या चालण्याच्या शैलीपासून, केसांच्या स्टाइलपर्यंत प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना प्रचंड आवडते म्हणूनच या मालिकेत त्यांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची समजली जाते. त्यांच्या मानधनावर बोलायचं झाले, तर योगेश त्रिपाठीला या कार्यक्रमासाठी प्रत्येक भागासाठी 35 हजार इतके मानधन दिले जाते. त्यांची या कार्यक्रमात जास्त भूमिका नसली तरी काही मिनिटाच्या भूमिकेसाठी त्यांना 35 हजार इतके मानधन दिले जाते.

Bhabiji Ghar Par Hain's Yogesh Tripathi AKA Happu Singh Had a Working  Birthday | 📺 LatestLY

दरम्यान या मालिकेसाठी योगेश त्रिपाठी यांची निवड काही मोजक्या भागांसाठी झाली होती मात्र प्रेक्षकांनी भरभरुन दिलेला प्रतिसाद आणि त्यांची लोकप्रियता पाहून त्यांना या कार्यक्रमात कायमची भूमिका देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या मालिकेच्या यशाने आणि योगेश त्रिपाठी यांच्या भूमिकेने हा निर्णय योग्यच असल्याचे दाखवून दिले आहे.

हेही वाचा :

Latest Post