ऋतुजा बागवे ही मराठी इंडस्ट्रीमधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. वेगवेगळ्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तिचा सोज्वळ अंदाज नेहमीच प्रेक्षकांना भावतो. आजकाल अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय राहून चांगल्याच चर्चा रंगवत असते. सतत आपले ग्लॅमरस फोटो शेअर करून, ती चाहत्यांचे लक्ष वेधते. अलीकडेच तिने पोस्ट केलेला फोटो चाहत्यांमध्ये खूप पसंत केला जात आहे.
ऋतुजा बागवेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणेच कमालीची सुंदर दिसत आहे. यात तिने केशरी रंगाचा अतिशय सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे. सोबतच हाय हिल्स घालून आणि केस मोकळे सोडून, तिने ओढणी हवेत उडवत पोझ दिली आहे. (glamorous photo shared by rutuja bagwe on social media)
ऋतुजाचा ड्रेस फ्लाँट करतानाचा हा फोटो चाहत्यांमध्ये खूप पसंत केला जात आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “आम्हाला उडण्यासाठी पंखांची गरज नाही.” या फोटोवर आता लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पडत आहे. चाहत्यांशिवाय, कलाकारही तिच्या या ग्लॅमरस लूकवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. शिवाय ऋतुजाचे बोल्ड फोटोही बऱ्याचदा व्हायरल होत असतात. एकंदरीत प्रत्येक लूक ती अतिशय उत्तमरीत्या कॅरी करते.
सन २००८ मध्ये ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून ऋतुजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’,’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. यानंतर तिने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. आता अभिनेत्री ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेद्वारे दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येते. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘सुंदर अन् सुशील!’ अक्षय कुमारची अभिनेत्री चित्रांगदाने साडीतील फोटो शेअर करत लावलं नेटकऱ्यांना याड
-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’