गॉडझिला vs काँग: महाकाय लढाई पाहण्यास प्रेक्षक उत्सुक, भारतात दोन दिवस आधीच होणार चित्रपट रिलीझ

godzilla vs kong to release in india on march 24 two days before the actual release date tmov


‘गॉडझिला’ आणि ‘काँग’ ही अशी दोन पात्रे आहेत, जे गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहेत. या सीरीजचा सिक्वल 26 मार्च रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. तथापि, 2 दिवसांपूर्वी म्हणजेच 24 मार्चला ‘गॉडझिला vs काँग’ चित्रपट भारतीय प्रेक्षकांना पाहायला मिळेल. भारतातील वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्सचे उपाध्यक्ष आणि एमडी डेन्झील डियास यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

ते म्हणाले, “ट्रेलरला जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्ही हा मेगा चित्रपट दोन दिवसांपूर्वीच भारतात रिलीझ करणार आहोत. जेणेकरुन भारतीय प्रेक्षक लवकरात लवकर या चित्रपटाचा आनंद लुटू शकतील.” अ‍ॅडम विंगार्ड दिग्दर्शित या चित्रपटात किंग काँग आणि गॉडझिला यासारख्या पौराणिक कथांमधील पात्रांची जोरदार टक्कर दिसणार आहे. या दोघांमधील युद्ध किती भयानक आहे, हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

गॉडझिला आणि किंग काँग यांच्यातील युद्धाबद्दल दिग्दर्शक अ‍ॅडम म्हणाले की, “1962 पासून या युद्धाबद्दल चर्चा सुरू आहे. ही अशी गोष्ट आहे की, जर हे दोन मेगा पात्र एकत्र आले, तर त्यांच्यातील टक्कर बरीच मजेदार असेल. प्रत्येकजणाचा या दोघांपैकी एक तरी आवडता आहे, हे लक्षात आल्यानंतर आम्ही दोन्ही पात्रांच्या चाहत्यांना समाधानी करू शकू, असा प्रयत्न केला आहे.”

अ‍ॅडम यांनी पुढे सांगितले, “या दोघांच्यात काही खास शक्ती आहेत, तर त्यांच्यात काही कमतरता आहेत. म्हणून आम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या आहेत. ही आतापर्यंतची सर्वात महाकाय लढाई होणार आहे, हे लक्षात घेणे आमच्यासाठी महत्त्वाचे होते.”

प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयीचा उत्साह वाढविण्यासाठी निर्मात्यांनी या चित्रपटाचे एकूण दोन ट्रेलर रिलीझ केले आहेत. तसेच, या दोन्ही ट्रेलरला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-…म्हणून जगाचा निरोप घेण्यापूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांना वाटत होते, राजेश खन्ना यांना मारावी कडकडून मिठी; वाचा ते कारण

-टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री, एका दिवसाचे घेतात जवळपास दीड ते दोन लाख मानधन

-‘बॉम्बे बेगम’ मधून पूजा भट्ट करणार डिजिटल पदार्पण, ‘या’ अभिनेत्रीही साकारणार मुख्य भूमिका


Leave A Reply

Your email address will not be published.