छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध, पण तितकाच वादग्रस्त म्हणून ओळखला जाणारा शो म्हणजे, ‘बिग बॉस’ होय. ‘बिग बॉस 16‘ पर्व आता आठव्या आठवड्यात पोहोचला आहे. आतापर्यंत चाहत्यांना वाईल्ड कार्ड एन्ट्रीची प्रतीक्षा होती. चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्ध व्यक्ती आणि पुण्याचा ‘गोल्डन बॉय’ सनी नानासाहेब वाघचौरे याने बिग बॉसमध्ये पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे. याची माहिती सनी वाघचौरे याने स्वत: त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत दिली आहे. सनीसोबत संजय गुजर हा ‘गोल्डन बॉय’देखील बिग बॉसमध्ये आला आहे. या दोघांच्या बिग बॉसमधील एन्ट्रीने सर्वत्र त्यांचीच चर्चा रंगली आहे.
सनी वाघचौरेची पोस्ट
‘गोल्डन बॉय’ सनी वाघचौरे (Sunny Waghchoure) याने सोशल मीडियावर ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये बिग बॉसचा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझे स्वप्न पूर्ण होत आहे. बिग बॉस एन्ट्री.” त्याच्या या पोस्टमुळे एकच खळबळ माजली होती. यानंतर बिग बॉसकडूनही कळवण्यात आले होते की, बिग बॉसमध्ये ‘गोल्डन एन्ट्री’ होणार आहे.
View this post on Instagram
‘बिग बॉस 16’मध्ये मंगळवारच्या (दि. 29 नोव्हेंबर) एपिसोडदरम्यान गोल्डन बॉईज सनी वाघचौरे आणि संजय गुजर (Golden Boys Sunny Waghchaure And Sanjay Gujar) हे शोमध्ये एन्ट्री करताना दिसले होते. त्यांच्याकडील सोन्याच्या वस्तूंमुळे त्यांना ‘गोल्डन बॉईज’ म्हटले जाते. त्यांच्या एन्ट्रीच्या घोषणेसोबतच ही घोषणाही करण्यात आली आहे की, बिग बॉसच्या घरातील व्यक्तींना आता हरवलेली 25 लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळवण्याची संधी आहे. यासाठी त्यांना एक टास्कही असणार आहे.
View this post on Instagram
तब्बल 25 लाख रुपये मिळण्याची संधी
बिग बॉसने सांगितले की, या टास्कमध्ये बिग बॉसच्या ऍक्टिव्हिटी भागाला एका तिजोरीच्या रूपात डिझाईन करण्यात आले आहे. यामध्ये 25 लाख रुपयांच्या सोन्याच्या नाण्यांचा डोंगर आहे. या 25 लाख रुपयांना पुन्हा मिळवण्यासाठी घरातील सदस्यांना 7 आकड्यांचा पासकोड तोडावा लागेल. हे ऐकून सर्वजण हैराण होतात. बिग बॉस वेगवेगळ्या वेळेनुसार टास्क शेअर करतील, ज्यामार्फत स्पर्धकांना कोड शोधण्यास मदत होईल.
सनी वाघचौरेची का होत आहे एमसी स्टॅनशी तुलना?
सनी वाघचौरे ‘गोल्डन बॉय’ आहे, तर एमसी स्टॅन (MC Stan) हादेखील कोट्यवधी रुपयांचे दागिणे परिधान करतो. असे म्हटले जात आहे की, दोघेही खासगी आयुष्यात एकमेकांना ओळखतात. त्यांच्यात खूप चांगला बॉन्डही आहे. आता सनीच्या पोस्टवर चाहते रिऍक्ट करत आहेत की, शोमध्ये आणखी एक एमसी स्टॅन येत आहे. शोमध्ये दोघेही आपले दागिणे फ्लॉन्ट करतानाही दिसले आहेत.
View this post on Instagram
कोण आहे सनी वाघचौरे?
सनी वाघचौरे आणि संजय गुजर यांना ‘गोल्डन बॉईज’ म्हटले जाते. दोघेही पुण्यातील रहिवासी आहेत. सोशल मीडियावरही त्यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, सनी आणि बंटी दररोज अडीच ते तीन किलो सोन्याचे दागिणे परिधान करतात. हीच त्यांची ओळख आहे. याव्यतिरिक्त दोघांकडेही महागड्या गाड्यांचा ताफा आहे. त्यांची बॉलिवूड कलाकारांसोबत चांगली ओळख आहेत. तसेच, ते वेगवेगळ्या व्यवसायातही त्यांचा पैसा गुंतवतात.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
अरे व्वा! प्रेमासाठी त्याग, संघर्ष करणाऱ्या प्रेमवीरांचा सिनेमा 9 डिसेंबरला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
जमतंय की राव! सिद्धूने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिनला मराठी बोलायला पाडलं भाग, व्हिडिओ पाहाच