एसएस राजामौली दिग्दर्शित आरआरआर चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. नुकतंच या चित्रपटामधील नाटु नाटु गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाला होता, जे भारतासाठी खूपच अभिमानस्पद होता. त्याशिवाय या गाण्याची मोजणी ऑस्कर नामांकणासाठी देखिल करण्यात आली आहे. आरआरआर चित्रपटाने भारतच नाही तर विदेशातील मोठमोठ दिग्गज दिग्दर्शकांना भुरळ घातली आहे. त्यामुळे या चित्रपटाचा किर्ती डंका जगभरात वाजत आहे. अशातच या गाण्याने अजून एक प्रतिष्ठीत पुरस्कार आपल्या नावावर केला असुन देशाचं नाव अजून मोठं केलं आहे
अमेरिकामध्ये एमएम कीरावनी (M. M. Keeravani) यांनी बनवलेल्या गाण्याला लॉस एंजेलिस फिल्म क्रिटिक्स तर्फे बेस्ट म्युजिक कोर अवॉर्डने सन्मानित केलं आहे. या पुरस्कारानंतर कीरावनी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याशिवाय त्यांनी आरआरआर (RRR) चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली (S. S. Rajamouli) यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासाठी अभार मानले आहे.
नाटु नाटु (Natu Natu) गाणयाने भारतीयांनाच नाही तर जगाला नाचवलं आहे. चित्रपटाचं आणि गाण्याचे जेवढे कौतुक कराल तेवढं कमीच आहे. नाटु नाटु गाण्याला मिळालेल्या नामांकणाबद्दल स्वत: आरआरआर चित्रपटाच्या अधिकृत अकाउंटवरुन पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. ही पोस्ट पाहून अनेक चाहत्यांचा आनंदाचा ठिकाणाच राहिला नाही. आरआरआर टीमने पोस्ट शेअर करत लिहिले की, “आपलो म्युजिक कंपोजर एमएम कीरावनी यांना बेस्ट म्युजिक/स्कोरसाठी अवॉर्ड जिंकण्यासाठी शुभेच्छा.” या पोस्टनंतर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. त्याशिवाय आरआरआर चित्रपटाच्या पूर्ण टीमला शुभेच्छा देखिल देण्यात येत आहेत.
View this post on Instagram
सांगायचे झाले तर आरआरआर हा चित्रपट तेलुगू सेनानियों, अल्लूरी सीतारम राजी कोमारामा भीम यांच्या जावनावर आधारित अएक काल्पनिक कथा आहे. यामध्ये मुख्य भूमिकेत ज्युनिअर एनटीआर (Jr. NTR) आणि राम चरण (Ram Charan), श्रिया सरन (Shriya Saran), आलिया भट्ट (Aliya Bhatt) आणि अजय देवगन (Ajay Devgone) सारख्या दमदार कलाकारांनी काम केले आहे. या चित्रपटाने जगभरातच 1200 कोटी पेक्षाही जास्त कमाई केली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दाक्षिणात्य स्टारर महेश बाबूची लाडकी सिताराचे फोटो पाहिलेत का?
लावण्य म्हणजे साडी! सुरभी चंदनाचा हटके साडी लूक होतोय व्हायरल..