चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’?


कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम चित्रपटसृष्टीवर देखील बऱ्याच अंशी झाला आहे. अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांसोबत थिएटर मालकांना देखील मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले गेले आहेत. नुकतेच दिल्ली शासनाने ५०% क्षमतेने थिएटर चालू करण्याची परवानगी दिली आहे. जे निर्माते चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघते होते त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

जास्त बजेट असणारे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटाचा समावेश आहे. काही राज्यांमध्ये चित्रपटगृह ५०% क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु महाराष्ट्रात ही परवानगी मिळाली नाही. परंतु जर महाराष्ट्राने चित्रपटगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला, तर अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित केला जाण्याची शक्यता आहे.

नुकतेच महाराष्ट्रातील प्रमुख व्यक्तींपैकी एका व्यक्तीने अक्षय कुमारसाठी प्रतिक्रिया दिली आहे की, “दिल्ली सरकारने ५०% क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचे स्वागत आहे. आम्ही अशी आशा करतो की, महाराष्ट्रातील चित्रपटगृह सुरू होतील. राज्यातील चित्रपटगृहांना निदान रोजची त्यांची भाकरी कमावण्याचा अधिकार आहे.” (Good news for fans, Akshay Kumar’s bell bottam film may release in theatre)

जर महाराष्ट्रातील चित्रपटगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला, तर अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट जवळपास १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी स्वतः अक्षय कुमारने या गोष्टीचा खुलासा केला होता की, त्याचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून अक्षय कुमारचा कोणताही चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे त्याच्या या चित्रपटासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड…!’

-वडिल सैफने केले दुर्लक्ष, मात्र तैमूरने पॅपराजींना दाखवला एखाद्या स्टारप्रमाणे स्वॅग!! पाहा व्हिडिओ

-धर्मेंद्र यांनी केले रणवीर सिंग अन् आलिया भट्टचे तोंडभरून कौतुक; आगामी काळात ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र


Leave A Reply

Your email address will not be published.