धर्मेंद्र यांनी केले रणवीर सिंग अन् आलिया भट्टचे तोंडभरून कौतुक; आगामी काळात ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र


करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दिग्गज अभिनेते धर्मेंद्रसोबत रणवीर सिंग आणि आलिया भट्ट दिसणार आहे. यासाठी धर्मेंद्र खूप उत्साहित आहेत. नुकतेच त्यांनी रणवीर आणि आलियासोबत काम करण्याचा त्यांचा अनुभव शेअर केला आहे.

ई-टाईम्स सोबत बोलताना धर्मेंद्र यांनी रणवीर आणि आलियाच्या कामाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, “रणवीर त्याच्या सगळ्या चित्रपटात खूप नॅचरल दिसतो. तो खूपच चांगला मुलगा आहे. आम्ही जेव्हा केव्हा एखाद्या कार्यक्रमात भेटतो तो नेहमीच माझ्या शेजारी येऊन बसतो. अशीच आलिया देखील तिच्या कामाबाबत खूप चांगली आहे.” जया बच्चन आणि शबाना आझमीसोबत पुन्हा एकदा काम करण्याबाबत देखील ते म्हणाले की, “त्या चित्रपटादरम्यान जया मला नेहमी म्हणायची की, धरम मी फॅन आहे तुमची. मी आता हे खरंच म्हणू शकतो की, ती माझी फॅन आहे.”

ते पुढे म्हणाले की, “शबाना एक चांगली कलाकार आहे. मला अजूनही आठवत आहे की, आम्हाला ‘बिच्छू’ नावाच्या एका चित्रपटात काम करायचे होते. परंतु दुर्भाग्याने चित्रपट पूर्ण झाला नाही. आता या चित्रपटात आम्ही ती कमतरता भरून काढणार आहोत.”

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. रणवीर सिंगच्या वाढदिवशी त्याला बक्षीस म्हणून करण जोहरने या चित्रपटाची घोषणा केली होती. या आधी रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांना ‘गल्ली बॉय’ या चित्रपटात एकत्र पाहिले गेले आहे. यात त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कलाकारांपेक्षाही अधिक लाइमलाइटमध्ये आहेत त्यांची मुलं; जाणून घ्या ‘या’ स्टारकिड्सबद्दल

-मोठी बातमी! ‘बिग बॉस’ फेम यशिका आनंद कार अपघातात गंभीर जखमी; मैत्रिणीचा जागीच झाला मृत्यू

-सोनम कपूरच्या घरी आला नवीन चिमुकला पाहुणा; फोटो शेअर करून अभिनेत्रीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी


Leave A Reply

Your email address will not be published.