ही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड…!’


बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खानची मुलगी इनाया बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय मुलांपैकी एक आहे. करीना कपूरचा मुलगा तैमूर अली खानप्रमाणेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. जेव्हा इनायाचा एखादा व्हिडिओ शेअर केला जातो, तेव्हा हाहा म्हणता तो व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतो. सोहाने इनाया सोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सोहा अलीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, छोटी इनाया तिच्या आईचा म्हणजेच सोहाचा मेकअप करताना दिसत आहे. सोहा सोफ्यावर बसलेली आहे. तर इनाया उभी राहून तिला लिपस्टिक लावताना दिसत आहे. छोट्या इनायाचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडत आहे. या व्हिडिओमध्ये इनायाने गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला आहे. तसेच तिने केसांना गुलाबी रंगाची पोनी टेल लावली आहे. सोहा देखील ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता घालून सोफ्यावर बसलेली दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून सोहाने लिहिले आहे की, “माझ्या नवीन मेकअप असिस्टंटला भेटा.”

त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच तिचे अनेक चाहते या व्हिडिओवर प्रतिक्रिया देऊन इनायाचे कौतुक करत आहेत. तसेच अनेक कलाकारांनी देखील या व्हिडिओवर कमेंट करून इनायाचे कौतुक केले आहे. (Soha Ali share her video with daughter Innaya, said meet my new makeup assistant)

या आधी देखील इनायाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिची क्यूटनेस चाहत्यांना खूप आवडते. ती एक लोकप्रिय स्टारकिड आहे. नुकतेच तिला आणि तैमूर अलीला त्यांच्या घराबाहेर स्पॉट केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कलाकारांपेक्षाही अधिक लाइमलाइटमध्ये आहेत त्यांची मुलं; जाणून घ्या ‘या’ स्टारकिड्सबद्दल

-मोठी बातमी! ‘बिग बॉस’ फेम यशिका आनंद कार अपघातात गंभीर जखमी; मैत्रिणीचा जागीच झाला मृत्यू

-सोनम कपूरच्या घरी आला नवीन चिमुकला पाहुणा; फोटो शेअर करून अभिनेत्रीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी


Leave A Reply

Your email address will not be published.