वडिल सैफने केले दुर्लक्ष, मात्र तैमूरने पॅपराजींना दाखवला एखाद्या स्टारप्रमाणे स्वॅग!! पाहा व्हिडिओ


बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्स लाइमलाईटमध्ये असतात. त्यातील सर्वात लोकप्रिय स्टारकिड म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमूर अली खान. तैमूरची लोकप्रियता खूप आहे. सोशल मीडियावर त्याचे फोटो वेगाने व्हायरल होत असतात. जन्मल्यापासूनच तो खूप प्रसिद्ध आहे. आता देखील सोशल मीडियावर तैमूरचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याचा स्वॅग कोणत्या कलाकारापेक्षा कमी नाहीये. 

तैमूरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत त्याचे वडील सैफ अली खान देखील दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सैफ तैमूरला घेऊन घराच्या बाहेर गाडीतून उतरतो. तिथे सगळे पॅपराजी हजर असतात. पॅपराजींना पाहून तैमूर खाली उतरतो आणि उत्साहाने मीडिया असं म्हणतो आणि पोझ देऊ लागतो.

पॅपराजी सैफ अलीला सैफ सर, सैफ सर म्हणून आवाज देत असतात, पण तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करून घरात घेऊन जातो. मात्र तैमूरला घरात येण्यासाठी जबरदस्ती करत नाही. तैमूर एखाद्या स्टारप्रमाणे पॅपराजींना वेगवेगळ्या अंदाजात पोझ देतो. तितक्यात गाडीतून सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांची मुलगी इनाया उतरते. पण ती न थांबता घरात निघून जाते. यानंतर तैमूर देखील एका स्टारप्रमाणे ‘नो फोटोज् प्लिज’ असं म्हणून घरात जातो. यावर पॅपराजी देखील त्याला ओके आणि थॅंकू यू म्हणतात. (Taimur ali khan give pose to paparazzi, video viral on social media)

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तैमूर नेहमी प्रमाणेच खूप क्यूट दिसत आहे. त्याने आकाशी रंगाचा शर्ट आणि शॉर्ट पँट घातली आहे. तसेच निऑन कलरचे शूज घातले आहे. यामध्ये इनाया देखील खूप क्यूट दिसत आहे. ती लॉलीपॉप हातात घेऊन जाताना दिसत आहे.

सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांना या वर्षाच्या सुरुवातीला दुसरा मुलगा झाला आहे. परंतु त्यांनी अजुन त्यांच्या दुसऱ्या मुलाचा चेहरा सोशल मीडियावर दाखवला नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कलाकारांपेक्षाही अधिक लाइमलाइटमध्ये आहेत त्यांची मुलं; जाणून घ्या ‘या’ स्टारकिड्सबद्दल

-मोठी बातमी! ‘बिग बॉस’ फेम यशिका आनंद कार अपघातात गंभीर जखमी; मैत्रिणीचा जागीच झाला मृत्यू

-सोनम कपूरच्या घरी आला नवीन चिमुकला पाहुणा; फोटो शेअर करून अभिनेत्रीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी


Leave A Reply

Your email address will not be published.